SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हिरो’च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार चर्चा, सिंगल चार्जमध्ये मिळणार जबरदस्त रेंज..!

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन, अनेक कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये वाहनांची निर्मिती करीत आहेत..

वाहन उद्योगातील भारतातील सर्वाधिक यशस्वी ब्रॅंड म्हणजे, हिरो..! आतापर्यंत ‘हिरो’ (Hero) कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये स्कूटरची मालिकाच भारतात रिलीज केलीय. ‘हिरो इलेक्ट्रिक’ लवकरच 2022 साठी ‘ऑप्टिमा सीएक्स’ (Optima CX) मालिका अपग्रेड करणार आहे.

Advertisement

हिरो इलेक्ट्रिक्सकडून ‘सीएक्स’ (CX) व ‘सीएक्स ईआर’ (CX ER) (विस्तारित श्रेणी) अशा दोन व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्यांचे स्पेसिफिकेशन, फीचर्स नि इतर डिटेल्स लीक झाले आहेत.

दिल्ली एक्स शो-रुमनुसार ‘हिरो ऑप्टीमा सीएक्स’ स्कूटरची किंमत 62,190 रुपये ठेवली आहे. ‘ऑप्टिमा सीएक्स’ आणि ‘सीएक्स ईआर’ या ई-स्कूटरच्या आगामी दोन व्हेरिएंटची किंमत ‘ऑप्टीमा एचएक्स’च्या जवळपास असू शकते, असे सांगण्यात आलं.

Advertisement

‘हिरो’च्या ‘सीएक्स’ ब्रँडमध्ये एकच बॅटरी पॅक दिला जाईल, तर ‘सीएक्स ईआर’ व्हेरिएंटमध्ये डबल बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. ‘हिरो ऑप्टिमा सीएक्स’ ही ‘ऑप्टिमा एचएक्स’चे अपडेट व्हर्जन असेल. मागील मॉडेलपेक्षा ‘ऑप्टीमा सीएक्स’चे माॅडेल 25 टक्के अधिक शक्तिशाली असू शकते. इलेक्ट्रिक मोटरची शक्तीही 10 टक्के जास्त असेल. त्यामुळे स्कूटरचा वेग जास्त असणार आहे.

ई-स्कूटरची वैशिष्ट्ये

Advertisement
  • ऑप्टिमा सिरीजमध्ये 52.2 व्होल्ट, 30-A लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅक आहे.
  • बेस सीएक्स व्हेरिएंटला सिंगल युनिट मिळते, जे 82 किमी रेंज देते, तर ‘सीएक्स ईआर’ ड्युअल बॅटरीसह मिळेल.
  • एका चार्जवर 140 किमी रेंज देऊ शकते.
  • हिरो ऑप्टीमा सीएक्स व सीएक्स ईआर इलेक्ट्रिक स्कूटरचा बॅटरी पॅक 550 वॅटची पॉवर जनरेट करील.
  • स्कूटरची सर्वोच्च गती 45 किलोमीटर प्रति तास असेल.
  • ब्रेकिंग 30 टक्क्यांनी मजबूत केले असून, दोन्ही व्हेरिएंटसाठी सुमारे 4-5 तास चार्जिंगची वेळ असेल. तसेच मजबूत ड्युअल चार्जर सेटअपसह येतील. दोन्ही व्हेरियंटमध्ये समान फिचर्स दिसून येतात.
  • दोन्ही व्हेरिएंटमध्ये क्रूझ कंट्रोल, वॉक असिस्ट, रिव्हर्स मोड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, USB चार्जिंग पोर्ट, एलईडी हेडलॅम्प आणि रिमोटसह अँटी-थेफ्ट अलार्म, अशी फिचर्स मिळतील.
  • ऑप्टिमा सीएक्सचे वजन 82 किलो, तर सीएक्स ईआरचे व्हर्जन अतिरिक्त बॅटरी पॅकमुळे 93 किलोपेक्षा थोडे जास्त आहे.

किंमत

  • ‘ऑप्टीमा सीएक्स’ची किंमत ‘ऑप्टीमा एचएक्स’पेक्षा जास्त असू शकते. 60000 ते 70000 रुपये (एक्स-शोरूम).
  • ‘ऑप्टीमा सीएक्स’चे दोन्ही माॅडेल निळा, राखाडी नि पांढरा कलरमध्ये मिळणार आहेत.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement