SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याच्या दरात झाला ‘एवढा’ बदल; वाचा, महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात काय आहेत भाव

मुंबई :

लग्नसराई आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम धांतूंच्या किमतीवर होत असतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने तेजी दिसून आलेली आहे. आताही आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात आज वाढ होताना दिसून आली. आज सकाळी 24 कॅरेट सोने 52,663 रुपये होते. कालच्या सोने दराच्या तुलनेत जवळपास 260 रुपयांनी वाढ झालेली आहे.

Advertisement

22 कॅरेट सोन्याचा भावही आज 250 रुपयांनी वाढला आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 48,250 रुपये आहे.

पुणे 48350 रुपये (22 कॅरेट) 52730 रुपये (24 कॅरेट)
नाशिक 48350 रुपये (22 कॅरेट) 52730 रुपये (24 कॅरेट)
मुंबई 48250 रुपये (22 कॅरेट) 52630 रुपये (24 कॅरेट)
नागपूर 48350 रुपये (22 कॅरेट) 52730 रुपये (24 कॅरेट)

 

Advertisement

असे जाणून घ्या सोन्याचे दर :-

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

Advertisement