SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधी व्हायरल झाला सुप्रिया सुळे आणि ‘त्यांच्या’ गप्पांचा व्हिडीओ; आता थेट tag केलं बॉलिवूडचं गाणं

मुंबई :

सध्या सोशल मिडीयावर नेत्यांचे, पुढाऱ्यांचे अगदी साधे सहज असणारे फोटो आणि व्हिडीओ नको ते अर्थ लावून व्हायरल केले जातात. कधी मजेने तर कधी सूडबुद्धीने हे काम केलं जातं. गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांचा एक चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Advertisement

या व्हिडीओत असे दिसून येते की, सुप्रिया सुळे यांच्या शेजारी असणारे खासदार उभा राहून बोलत होते. यानंतर सुप्रिया यांना बोलायचे असल्याने एका पॉलिसीविषयी त्या मागच्या बाकावर बसलेल्या थरूर यांच्याकडून माहिती घेत होत्या. या दोघांच्या चर्चेचा उभा राहून बोलणारे खासदार फारुख यांना अडथळा होऊ नये म्हणून ते कमी आवाजात बोलत होते.

यानंतर थरूर यांनी ट्वीट करत सांगितले की, लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाषणाची मजा घेऊ पाहणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की, त्या मला एका धोरणांसंदर्भातील प्रश्न विचारत होत्या, कारण संसदेत बोलण्यासाठी पुढचा क्रमांक त्यांचाच होता. फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून सुप्रियाजी हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी बाकावर खाली वाकलो होतो.

Advertisement

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना! तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहां बदनाम हुई’, असे म्हणत थरूर यांनी सुप्रिया यांना tag केले आहे.

Advertisement