SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे; बघा, काय आहे आरबीआयचा नवा प्रस्ताव

मुंबई :

दिवसेंदिवस ATM च्या माध्यमातून चोरी करण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. डिजिटल चोरी तर आत एकदम सहजपणे केली जात आहे, त्यामुळे ATM असो की डिजिटल पेमेंट नागरिकांनी सजग राहणे, गरजेचे आहे. अशातच ATM नसतानाही ग्राहक पैसे काढू शकतात, असा प्रस्ताव  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तयार केला आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी आज घोषणा केली आहे की, RBI ने भारतातील सर्व बँकांमधील सर्व ATM मध्ये कार्डलेस रोख पैसे काढण्याची (Cardless Cash Withdrawal to be Available at All Bank) सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. UPI द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

 

Advertisement

पुढे बोलताना दास यांनी सांगितले की, ही सुविधा वापरताना बँक कस्टमरला एटीएममधून पैसे काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही. कार्डविरहित रोख रक्कम काढण्याची सुविधा यूपीआयचा वापर करून सर्व बँकांमध्ये आणि एटीएम नेटवर्कमध्ये उपलब्ध करून दिली जावी. व्यवहारात सुलभता वाढवण्याव्यतिरिक्त, अशा व्यवहारांसाठी प्रत्यक्ष कार्डची आवश्यकता नसल्यामुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग इत्यादी प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल.

Advertisement