SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधारला जोडला जाणार ‘तो’ दाखला; ‘असा’ होणार लाखो लोकांना आर्थिक फायदा

मुंबई :

आजच्या या डिजिटल इंडियामध्ये आधार कार्ड ही भारतीय माणसाची महत्वाची ओळख बनलेली आहे. कुठेही गेले तरी आधार कार्डशिवाय कुठलेच काम पूर्ण होत नाही. बहुतांश ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जातेच. म्हणूनच आता आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र बनलेले आहे.

Advertisement

आता केंद्र सरकार एक मोठी यंत्रणा उभा करत आहे. ज्याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम (Automatic Verification system) अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारचे विविध प्रयत्न चालू आहेत. मात्र आता त्याआधी केंद्र सरकारने जातीचा दाखला (Caste Certificate) आणि उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) या गोष्टीदेखील आधार कार्डशी लिंक करण्याची योजना तयार केली आहे.

या नव्या योजनेमुळे लोकांना केंद्र सरकारकडून जी आर्थिक मदत केली जाते किंवा जो आर्थिक व्यवहार केला जातो अगदी शासकीय योजनांचे पैसे असले तरीही हे पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात होणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Student Scholarship) देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगात येणार आहे.

Advertisement

केंद्र सरकार महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांपासून ही सुविधा सुरू करणार आहे. याला कारण म्हणजे, या राज्यांनी विद्यार्थ्यांचा जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला आधारला लिंक (Aadhaar link with Caste certificate) करण्याचं काम पूर्ण केलं आहे. हा निर्णय घेण्यामागे स्कॉलरशिप (Scholarship with Aadhaar) व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्याचा उद्देशही आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयाचा फायदा देशभरातील 60 लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीममुळे केंद्राकडून येणारी शिष्यवृत्ती ही योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे.

Advertisement