SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टोल न भरता प्रवास करायचाय..? ‘गुगल’चे ‘हे’ खास फीचर करणार तुम्हाला मदत..!

चकचकीत रस्त्यावरुन गाडी पळवताना छान वाटतं.. मात्र, या गुळगुळीत रस्त्यांसाठी तुमचा खिसा कधी कापला गेला, हे तुम्हालाही समजत नाही.. केंद्रीय वाहतूक व रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच आता प्रत्येक 60 किलाेमीटरवर एक टोलनाका असणार असल्याचं सांगितलं होतं..

टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने अलिकडेच ‘फास्टॅग’ यंत्रणा आणली होती. मात्र, आता टोल वसुलीसाठी ‘जीपीएस’ (GPS) आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ तयार केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात रस्त्यावर टोलनाके दिसणार नाहीत, पण तुमचे पैसे मात्र कापले जाणार आहेत..

Advertisement

प्रवासादरम्यान कधीही टाळता न येणारा खर्च म्हणजे टोल. मात्र, चालक अनेकदा टोल (Toll) चुकविण्याचा प्रयत्न करीत असतात.. त्यासाठी काहीतरी युक्त्या लढवल्या जातात.. पण ते शक्य होत नाही.. मात्र, आता तुम्हाला टोल न भरता, शिवाय कायद्यात राहून प्रवास करता येणार आहे.. त्यासाठी तुमच्या मदतीला आलं आहे, ‘गुगल’..!

‘गुगल’ने (Google) वाहनचालकांसाठी एक खास फीचर आणलंय.. या फीचरच्या साहाय्याने तुम्ही टोल न भरता, मात्र नियमात राहून प्रवास करू शकता. कसा ते सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘गुगल’च्या नव्या फीचरबाबत..

‘गुगल’नं एक नवे फिचर आणलंय.. ‘टोल प्राइस’ असं त्याचं नाव… ‘गुगल’च्या माहितीनुसार, हे फीचर भारतासह इंडोनेशिया, जपान नि अमेरिका या देशांमध्ये एप्रिल महिनाअखेरीस उपलब्ध होणार आहे. माेबाईलमधील ‘गुगल प्ले स्टोअर’मधून हे फीचर घेता येईल. स्थानिक टोलिंग अधिकाऱ्याच्या माहितीवर ‘टोल प्राइस’ फीचर अवलंबून असेल.

Advertisement

कसा फायदा होणार..?

  • ‘टोल प्राइस’च्या मदतीने वाहनचालकाला त्यांच्या प्रस्तावित मार्गावर किती ठिकाणी टोलनाके आहेत? त्यांना किती टोल द्यावा लागेल? याची माहिती मिळणार आहे..
  • तुम्ही ज्या मार्गावरून प्रवास करणार आहात, त्यावर टोलमुक्त रस्ते आहेत का, याचीही माहिती मिळू शकणार आहे.
  • टोल पास, साप्ताहिक, तसेच दैनंदिन, दिवसाच्या कोणत्या वेळेत आदी ‘पेमेंट मेथड्स’ या फीचरमध्ये असतील.
  • देशातील 2000 पेक्षा अधिक टोलमार्गांचा तपशील या फीचरमध्ये असेल.
  • टोलमुक्त मार्गांची माहिती फीचरमध्ये असल्याने टोल वाचवून प्रवास कसा करायचा, हे चालकाला समजणार आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement