SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): व्यवहार सजगतेने करावा. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मानसिक स्थिरता बाळगावी. दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. काळजीमुळे मनावर ताण राहील.

वृषभ (Taurus): मित्रांसोबत बाहेर रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल. दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे . मानसिकदृष्ट्या आनंदी असाल.

मिथुन (Gemini) : व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल. मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी दिवस चांगला आहे. नवीन काम सुरू करू नये. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) : व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. बॉसवर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल. कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

Advertisementसिंह (Leo) : खेळाडूंना चांगली संधि मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या (Virgo) : घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण संबंध होतील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील.

तुळ (Libra) : कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील.

वृश्‍चिक (Scorpio) : कामाची घाई करू नका. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचे नियोजन कराल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात चांगला नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. कुटुंबीयांशी पण मतभेदाचे प्रसंग उद्भवतील.

Advertisementधनु (Sagittarius) : वडीलधार्‍यांचा योग्य पाहुणचार करावा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत. कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. वायफळ खर्च होईल. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्य उत्तम राहील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल.

मकर (Capricorn) : उष्णतेच्या आजारांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका. सुप्त चळवळेपणा कामाला लावा. दिवस लाभदायक आहे. मित्रांच सहकार्य मिळेल. एखाद्या सुंदर जागी प्रवास करू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarious) : संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील.

मीन (Pisces) : घरातील वातावरण शांत ठेवावे. बाहेर न जाता आज घरकामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. प्रवासाचा योग आहे. परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून शुभ वार्ता येतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल.कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेण्याचा उत्साह राहील, त्यात चांगलं कराल.

Advertisement