SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘या’ किमतीच्या खाली पेट्रोल मिळणार नाही, ‘या’ कारणामुळे पेट्रोलपंप मालकाने पेट्रोल देण्यास दिला नकार..

देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ (Petrol – diesel price hike) होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 120 रुपये प्रति लिटरच्या जवळपास पोहोचले आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता एक अजब प्रकार समोर आला आहे.

नागपुरातील एका पेट्रोल पंप (Nagpur Petrol Pump) चालकाने 50 रुपयांपेक्षा कमी किमतीचे पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. अर्थात त्याने एक कागदी प्रिंट चक्क चिकटवूनच ठेवली आहे. वाढलेल्या किमतीमुळे एक लीटर पेट्रोल भरणे अनेकांना शक्य नाही. यातच नागपुरमध्ये काही पेट्रोल पंप चालकांनी ’50 रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही’ असे फलक लावले आहेत.

Advertisement

सामान्य नागरिक इंधनाच्या दरवाढीमुळे आणि आधीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्याने गरजेनुसार पेट्रोल टाकत आहे. मात्र मात्र, आता ही शक्कलही नागपूरमध्ये फेल ठरत आहे. कारण या अशा फलकामुळे नागरिक हैराण झाल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे पेट्रोलपंप मालकांनी वेगळीच व्यथा सांगितली आहे.

नागपुरातील एका पेट्रोलपंप मालकाने म्हटले की, वाहन चालक आताच्या घडीला 20 ते 30 रुपयांचे पेट्रोल टाकत आहेत. पण एवढे पेट्रोल टाकायला आमच्याकडे असलेली मशिन ही खूप वेगाने चालते. अशात जेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी जेव्हा नोझल उचलतो तेव्हा लगेचच म्हणजे काही सेकंदात 20-30 रुपयांचे पेट्रोल भरले पण जाते. पण ग्राहक आपली फसवणूक होत असल्याची शंका व्यक्त करतात आणि पेट्रोल कमी दिल्याचं सांगतात. यामुळे फलक लावल्याचा सांगण्यात आलं.

Advertisement

वाचा पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर:

शहर- पेट्रोल- डिझेल

Advertisement

अहमदनगर – १२०.९८ – १०३.६५
अकोला – १२०.४२ – १०३.१४
अमरावती – १२१.४९ – १०४.१८
औरंगाबाद – १२०.४८ – १०३.१७
भंडारा – १२१.१४ – १०३.८३
बीड – १२२.१२ – १०४.७६
बुलढाणा – १२०.८७ – १०३.५८
चंद्रपूर – १२०.५५ – १०३.३९
धुळे – १२०.१९ – १०२.९०
गडचिरोली – १२१.४० – १०४.१०
गोंदिया – १२१.६५ – १०४.३३
बृहन्मुंबई – १२०.५१ – १०४.७७
हिंगोली – १२१.१२ – १०३.८१
जळगाव – १२०.५२ – १०३.२२
जालना – १२१.९७ – १०४.६०
कोल्हापूर – १२०.५३ – १०३.२४
लातूर – १२१.२५ – १०३.९३
मुंबई शहर – १२०.५१ – १०४.७७
नागपूर – १२०.१६ – १०२.९०
नांदेड – १२२.५६ – १०५.२०
नंदुरबार – १२१.३२ – १०३.९९
नाशिक – १२०.८९ – १०३.५६
उस्मानाबाद – १२०.९२ – १०३.६१
पालघर – १२०.०७ – १०२.७५
परभणी – १२३.५३ – १०६.१०
पुणे – ११९.९८ – १०२.६८
रायगड – १२०.५७ – १०३.२३
रत्नागिरी – १२१.९४ –१०४.५७
सांगली -१२१.३४ – १०४.०२
सातारा -१२१.०३ – १०३.६९
सिंधुदुर्ग – १२२.०६ – १०४.७२
सोलापूर -१२०.५२ – १०३.२०
ठाणे -१२०.५८ – १०४.८३
वर्धा – १२०.६५ – १०३.३७
वाशिम – १२१.०१ – १०३.७१
यवतमाळ – १२१.५० – १०४.१८
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement