SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोदी-पवार भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ, समोर आल्या ‘या’ प्रतिक्रिया..

सक्तवसुली संचालनालयच्या (ईडी) राज्यातील अनेक कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. यामुळे या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’ करत असलेल्या या कारवाया अन्यायकारक असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदीं यांना सांगितलं. राज्यातील ‘ईडी’च्या अनेक कारवायांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची या भेटीवर प्रतिक्रिया:

‘सर्वच पक्षाचे नेते एकमेकांची भेट घेत असतात. शरद पवार यांना तब्बल 55 वर्षाचा संसदेतील राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळे पंतप्रधानांची भेट घेतली तर यात गैर काहीच नाहीये. राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून एकामागून एक धडक कारवाया सुरू आहेत, त्याबद्दलही या भेटीमध्ये चर्चा झाली असू शकते. पण मलासुद्धा या भेटीमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर झाल्या, हे माहीती नाही,’ असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या या भेटीनंतर सर्वत्र काही न काही चर्चा होत असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होतेय. भाजपची शिवसेनेसोबत नक्कीच कटुता आहे, मात्र राष्ट्रवादीशी कटुता असण्याचं सध्या कोणतं कारण नाही, असं त्यांनी म्हटलं.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रतिक्रियेवर अमोल मिटकरी यांनी आपलं मत व्यक्त करत म्हटल की, ‘केंद्रीय तपास यंत्रणांना कसलंही तथ्य नसताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. राष्ट्रवादी हा केवळ एक पक्ष नाही तर कुटुंब आहे, त्यामुळे आमच्यासाठी हे दोन्ही नेते महत्वाचे असून त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Advertisement

“ईडीच्या कारवायांमुळे सरकारला कोणताही धोका नाही. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार कायम राहील, असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोण काय बोलतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कोणाच्याही बोलण्यावरून भाजपसोबत जाण्याचा आमचा प्रश्नच नाहीये”, असं ते म्हणाले. राज्यातील तिन्ही पक्ष केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात पाऊलं उचलत असताना दिसत आहेत. याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आता भाजपावर सडकून टीका करत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement