SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात मोबाईल, टिव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ‘अ‍ॅमेझाॅन’वर ‘हा’ खास सेल सुरु..!

स्वस्तात मस्त टिव्ही किंवा मोबाईल घेण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. भारतातील नंबर वन ई-काॅमर्स कंपनी ‘अ‍ॅमेझाॅन’वर ‘मोबाईल सेव्हिंज डेज सेल’ सुरु झाला असून, त्यात मोबाईल व स्मार्ट टिव्हीवर तुम्हाला तगडा ‘डिस्काऊंट’ मिळणार आहे.. 5 एप्रिलपासून सुरू झालेला हा सेल 9 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

‘अ‍ॅमेझाॅन’च्या प्रत्येक सेलमध्ये सर्वाधिक विक्री होते, ती स्मार्टफोन्सची.. ही बाब लक्षात घेऊन या सेलमध्येही कंपनीने स्मार्टफोनवर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे.. ग्राहकांना या सेलमध्ये मोबाईलवर चक्क 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Advertisement

इतकेच नाही, तर या सेलमध्ये तुम्ही आकर्षक ऑफरमध्ये मिवी (Mivi), सॅमसंग (Samsung), वन प्लस (OnePlus), रिलमी (Realme), रेडमी (Redmi), आयक्यूओओ (iQOO)सह इतर ब्रँड्सच्या ‘अ‍ॅक्सेसरीज’ खरेदी करू शकता.

‘मोबाईल सेव्हिंज डेज सेल’मध्ये कोणत्या मोबाईलवर नेमक्या कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

मोबाईल सेलबाबत…

  • तुम्ही ‘वन प्लस नाॅर्ड सीई-2’ हा 5G स्मार्टफोन या सेलमध्ये फक्त 21,999 मध्ये खरेदी करू शकता.
  • सॅमसंग गॅलक्सी एम-32 (Samsung Galaxy M32) हा माेबाईल फक्त 11,749 रुपयांत मिळणार आहे.
  • शाओमी-11X स्मार्टफोन 22,999 रुपये, शाओमी 11 लाईट एनई 5G हा फोन 21,999 रुपये, एमआय 11X Pro हा फोन 31,999 रुपये, रेडमी 11 प्रो प्लस 5G हा फोन 18,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच iQOO फोनवर 6 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळतेय.

दरम्यान, या सेलमध्ये ‘बँक ऑफ बडोदा’ आणि ‘सिटी बँके’च्या कार्ड्सवर त्वरित 10 टक्के सूट उपलब्ध आहे. शिवाय एक्सेंज ऑफरमध्ये तुम्हाला अतिशय स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत..

Advertisement

टीव्हीवरील ऑफरबाबत…
तुमचा टिव्ही खरेदी करण्याचा विचार असेल, तर या सेलमध्ये तुम्हाला विविध ब्रॅंड्सच्या टिव्हीवर तब्बल 55 टक्क्यांपर्यंत सुट मिळणार आहे.. त्यात रेडमी, वन प्लस, सॅमसंग, तसेच सोनीसारख्या तगड्या ब्रॅंड्सचाही समावेश आहे..

  • ‘अ‍ॅमेझाॅन’च्या सेलमध्ये 32 इंच ‘वन प्लस’ (OnePlus TV) हा टिव्ही 15,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता.
  • रेडमी टिव्ही (32 इंच) 15,499 रुपयांना, तर 50-इंच 4K UHD मॉडेलची किंमत 34,999 रुपये आहे. ग्राहकांना सिटी बँक आणि बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांची ‘इन्संट’ सूट मिळत आहे. सोनी टिव्ही 22,799 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement