SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ लागू झाल्यास खरोखरच येतील ‘अच्छे दिन’; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर सरकारने आखला मास्टर प्लॅन

मुंबई :

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वारंवार वाढ केली जात आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 10 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डीझेलचे दर कमी करू, असे म्हटले होते. मात्र आताची परिस्थिती बघता इंधन दरवाढीमुळे (Price Hike) सरकारला आपल्या भारतीय जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान विरोधकांनीही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून देशात वाढत असलेल्या महागाईविरोधात निदर्शनं सुरू केलेली आहेत.

Advertisement

नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत तेल वितरण कंपन्यांनी इंधनदरात वाढ केली नव्हती. मात्र, महागणारे कच्चे तेल आणि होणारा तोटा कमी करण्यासाठी कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती भडकलेल्या असतानाही गेल्या 4 महिन्यांपासून देशात इंधन दरवाढ झालेली नव्हती. मात्र आता अच्छे दिन संपले असून दरवाढीचा बॉम्ब फुटला आहे.

मात्र आता याकडे सरकारला दुर्लक्ष करणे शक्य नसल्याने आता केंद्र सरकारने एक मास्टर प्लॅन आखला आहे. पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढत असलेल्या दरांना आता उपाय म्हणून एक्साईज ड्युटीवर काम  केले जाणार आहे. जर येत्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती कमी झाल्या नाहीत किंवा त्यामध्ये आणखी वाढ होत राहिली तर पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवरील एक्साईज ड्युटीमध्ये (Excise Duty) सरकारच्या वतीनं कपात केली जाणार आहे.

Advertisement

एवढेच नाही तर केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांनादेखील पेट्रोल-डिझेल व्हॅटमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या 2 गोष्टी केल्या तरी दरवाढ रोखता येऊ शकते व इंधनदर कमी होऊ शकतात मात्र याची अंमलबजावणी झाल्यासच हे शक्य होणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर केंद्र व राज्य सरकारने व्हॅट व एक्साईज ड्युटीट कपात केली तर खरोखरच पेट्रोल-डिझेल पुरते का होईना ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल 120 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे.

Advertisement