SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्याची कमाल! ‘या’ पिकाची लागवड करून कमावले 13 लाख रुपये, तुम्हीही प्रयत्न करा..

आताच्या शेतकऱ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील एक शेतकरी प्रेरणादायी ठरत आहे. कारण त्याने उत्पन्नच तेवढं काढलं आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असणाऱ्या मौजे पाटणमधील सागर पवारने फक्त 5 एकर क्षेत्रावर कलिंगड (Watermelon Farming) लागवड करून मोठे उत्पन्न मिळवले आहे.

साधारणतः दोन ते अडीच महिन्यांनंतर फळ उत्पादन काढण्यासाठी तयार होते आणि ते काढल्यानंतर या तरुण शेतकऱ्याने फक्त सव्वा दोन महिन्यात थोडे नव्हे तर तब्बल 13 लाख रुपये कमावले आहेत. वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता या शेतकऱ्याचे पंचक्रोशीत मोठे कौतुक केले जात आहे.

Advertisement

सागर पवार (Farmer Sagar Pawar) नामक हा शेतकरी शेतीसंबंधीतच बीएससी एग्रीकल्चर (Bsc Agriculture) शिकला आहे. त्याने नोकरी करणं सोडून, स्वतः सुशिक्षित असूनही स्वतःच्या शेतीवर काम करायला सुरुवात केली आणि मग पाहता पाहता त्याचे शेतीवरील प्रेम काही कमी झाले नाही.

आता तो वडिलोपार्जित शेती कसत आहे. शेतीत नावीन्यपूर्ण बदल करताना त्याने अचानक कलिंगड लागवडीचा (Watermelon Cultivation) निर्णय घेतला आणि हा प्रयत्न यशस्वीदेखील ठरला. आपल्या 5 एकर जमिनीवर सागरने जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कलिंगडची लागवड केली. लागवड करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला गेला.

Advertisement

एक एकर क्षेत्रात त्यांनी 8 हजार ते एकूण 5 एकर क्षेत्रात कलिंगडची 40 हजार रोपे लागवड केली. मग कोंबडी खत पिकाला देण्याचं ठरवलं. त्यांच्याकडे पाण्याचा मुबलक साठा असूनही मल्चिंग पेपर अंथरून मल्चिंग पेपरने पाण्याचे होणारे बाष्पीभवनही थांबवलं. अशा पद्धतीने ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून कलिंगड ची शेती यशस्वी करून दाखवली.

सागर पवारने कलिंगडसाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून कलिंगड स्थानिक बाजारपेठेत न पाठवता सरळ दिल्लीला पाठवले. दिल्लीतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत देशातील अनेक ठिकाणी आपला कलिंगड विकला. असं सर्व मिळून दर्जेदार उत्पादन त्यांना मिळालं आणि अवघ्या अडीच महिन्यात 13 लाख 32 हजारांची त्यांची कमाई झाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement