SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अरारा खतरनाक… ‘या’ कंपनीने आणलेत सगळ्यात स्वस्त प्लान्स; अवघ्या 49 आणि 99 रुपयात मिळतय ‘एवढं’ सगळं

मुंबई :

सध्या मोबाईल आणि टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्यांची जोरदार स्पर्धा सुरु आहे. आपण कसे दुसऱ्यापेक्षा कमी पैशात सेवा देऊ शकतो, यावरच सगळ्यांचा भर आहे. यात सरकारी कंपन्याही पुढे आहेत. आज आम्ही ज्या कंपनी आणि प्लान्सविषयी सांगणार आहोत, जिओची सुद्धा झोप उडाली आहे. तर ही कंपनी आहे BSNL.

Advertisement

BSNL ने मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अवघ्या 49 आणि 99 रुपयात त्यांनी इतक्या सेवा देऊ केल्याने बाकीच्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. आधी आपण दोन्ही प्लान विषयी जाणून घेवूयात. 49 रुपयांच्या या प्लानमध्ये एकूण 2 जीबी डेटा आणि 100 कॉलिंग मिनिटे दिली जातात. तर 99 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 22 दिवसांची वैधता मिळते. कंपनीचा 135 रुपयांचा प्लान देखील आहे. जो, 1440 कॉलिंग मिनिटांसह 24 दिवसांची वैधता देतो.

 

Advertisement

इतर कंपन्यांची तुलना करता 99 रुपयांचा प्लान सगळ्यात best mobile recharge plan आहे. इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 26 दिवसांसाठी दररोज 0.5 GB डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही आहे. त्याचप्रमाणे, 147 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 10 जीबी डेटा आणि 30 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.

Advertisement