SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जसप्रीत बुमराहसह ‘या’ खेळाडूला दणका, ‘बीसीसीआय’कडून मोठी कारवाई..!

इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’च्या 15व्या हंगामास जोरदार सुरुवात झाली आहे. अनेक सामने रोमांचक झाल्याने भारतात पुन्हा एकदा ‘क्रिकेट फिव्हर’ दिसू लागलाय.. विशेष म्हणजे, आता प्रेक्षकांची संख्याही वाढल्याने सामन्यांची मजा आणखीन वाढली आहे..

दरम्यान, गेल्या वेळचा चॅम्पियन ‘सीएसके’ व ‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी असलेला ‘मुंबई इंडियन्स’ या दोन्ही संघांना अजूनही लय सापडल्याचे दिसत नाही.. बुधवारी (ता. 6) मुंबई संघाला आणखी एका पराभवाला सामाेरे जावे लागले. केकेआर संघाने मुंबई संघाचा अगदी सहज पराभव केला. त्यामुळे मुंबई संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला..

Advertisement

संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच नाराज झाल्याचे दिसत होते.. त्याच वेळी त्यांचा फास्ट बाॅलर जसप्रित बुमराह याच्यासह ‘केकेआर’चा फलंदाज नितीश राणा याच्यावर ‘बीसीसीआय’ने कडक कारवाई केली आहे..

नेमकं काय झालं..?

Advertisement

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी (ता. 6) केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये चांगलाच रंगतदार सामना झाला. सामन्यादरम्यान केलेल्या गैरवर्तणुकीमुळे बुमराह व नितीश राणा यांच्यावर ही कारवाई केल्याचं बोललं जातं.

‘आयपीएल’ आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बुमराह व राणा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. नितीश राणाच्या सामन्याच्या मानधनातील 10 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली, तर बुमराहला त्याच्या वर्तणुकीबाबत समज देण्यात आली.

Advertisement

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल नितीश राणा याला फटकारण्यात आलं आणि त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के दंड करण्यात आला.. ‘आयपीएल’ आचारसंहितेच्या लेव्हल-1 गुन्ह्याची कबुली नितीश राणा याने दिली असून, शिक्षा मान्य केली.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल बुमराहलादेखील फटकारलं असून, समज देण्यात आली. ‘आयपीएल’ आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली बुमराहनेही दिली..” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे..

Advertisement

दरम्यान, पॅट कमिन्सच्या वादळी खेळीमुळे (15 चेंडूत 56) ‘केकेआर’ने मुंबईचं 162 धावांचे लक्ष्य 16व्या ओव्हरमध्येच गाठलं.. ‘केकेआर’ला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 35 रन लागत होते, पण डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिल्याने ‘केकेआर’ने अगदी सहज हा सामना जिंकला.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement