SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंगावर बंडी-धोतर, वय वर्ष 78 आणि सुसाट बाईक रॅली; ‘या’ पक्षाचा मराठी आमदार होतोय देशात व्हायरल

मुंबई :

वयाच्या 78 व्या वर्षी नेहमीच्या पारंपरिक पोशाखात भाजप नेते व माजी विधानसभा अध्यक्ष, आ. हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) हे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. भाजपचे नेते व कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याचा एक तुफान व्हिडीओ व्हायरल करत आहेत.

Advertisement

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्वच भाजप(BJP) नेते, कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. औरंगाबादमध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनीही सुसाट बाईक रॅली काढली. नाना या नावाने लोकप्रिय असलेले हरिभाऊ बागडेंच्या रॅलीचा हा व्हिडिओ सध्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होतोय.

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या पारा ४१ अंशावर पोहचला आहे. दुपारच्या रखरखत्या उन्हात अंगाचा काहीली होत असल्याने नागरिक घरातच बसून राहणे पंसत करतात. पण तरीही भाजप स्थापना दिवस असल्याने दुपारी शेंद्रा ते करमाड अशीही वाहन रॅली काढण्यात आली. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या बाईकवर भाजपचा झेंडा लावून सहभागी झाले होते. बागडे यांना देखील बाईक चालवण्याचा मोह आवरला नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पठाडे यांना पाठीमागे बसवून बागडे यांनी स्वःत बाईक चालवली.

Advertisement

78 वर्षीय हरिभाऊ नानांनी नेहमीच्या धोतरधारी वेशात अफलातून बाईक सवारी केली. एवढंच नाही तर बाइक चालवताना धोतर सावरत त्यांनी भारतीय जनता पार्टीची घोषणाबाजीही केलीय. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही थक्क झाले. औरंगाबादमधील इतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील या रॅलीत सहभागी होते.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून त्यांना विजय मिळवला. त्या विधानसभा निवडणुकीतच त्यांचे वय पाहता आता निवडणूक लढवू नये, अशी चर्चा सुरु होती. मात्र बागडे यांच्या उत्साहापुढे हा दबाव टिकला नाही. त्यांनी उमेदवारी खेचून आणली. निवडणूक लढवली आणि जिंकलेदेखील.

Advertisement