SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

2.60 कोटीच्या ‘या’ बॉलरने बुडवले मुंबईचे जहाज, रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?

आयपीएल 2022 मध्ये काल झालेल्या रोमांचक सामन्यात (IPL 2022) केकेआरने मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) दाणादाण उडवली असल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली आणि राजस्थान यांच्यानंतर आता केकेआरनेही मुंबईविरुद्धच्या सामन्यात (KKR vs MI) विजय मिळवला आहे. त्यामुळे सलग बसलेल्या पराभवाच्या धक्क्याने मुंबई इंडियन्स आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कालच्या अतिशय महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या पराभवाचं कारण डॅनियल सॅम्सची (Daniel Sams) लाजिरवाणी कामगिरी ठरली आहे. गेल्या सर्व मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. कारण केकेआरविरुद्ध डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले, या फुसक्या गोलंदाजीमुळे मुंबईवर पराभवाची नामुष्की ओढवली. तसं पाहिलं तर दोन्ही संघांना एकमेकांचे आव्हान तगडे होते. यावेळेस धावसंख्येची गती 15 व्या ओव्हरपर्यंत कमी असल्याने यामुळे दोन्ही संघांना काही उत्तम फटकेबाजी करता आली नसल्याचं दिसलं.

Advertisement

16 व्या ओव्हरपासून दोन्ही संघांची कमालीची धावसंख्या..

15 व्या ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने फिफ्टी करत आणि तिलक वर्माने अखेरच्या काही ओव्हरमध्ये सुरेख फटकेबाजी केली आणि मुंबईने 161 धावांपर्यंत मजल मारली. यानतर केकेआरने देखील 15 व्या ओव्हरनंतर फटकेबाजी केली. यापूर्वी केकेआरचा स्कोअर 127/5 एवढा होता, पण डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले आणि कोलकात्याचा 24 बॉल शिल्लक असताना विजय झाला. रोहित शर्माने 16 वी ओव्हर टाकण्यासाठी सॅम्सच्या हातात बॉल दिला आणि सॅम्सच्या या ओव्हरमध्ये कमिन्सने 4 सिक्स आणि 2 फोर मारले.

Advertisement

▪️ पहिल्याच बॉलला सिक्स मारला.
▪️ दुसरा बॉल फोर मारला.
▪️ तिसरा सिक्स
▪️ चौथा बॉलही सिक्स
▪️ओव्हरचा पुढचा बॉल सॅम्सने नो बॉल टाकला ज्यावर कमिन्सने 2 रन काढून अतिरीक्त 1 रन मिळाला.
▪️ ओव्हरचा पाचवा बॉल फ्री हिट असल्याने, ज्यावर कमिन्सने पुन्हा फोर खेचला.
▪️ सॅम्सच्या अखेरच्या बॉलवरही सिक्स मारत कमिन्सने मॅच जिंकवली.

दरम्यान मागील 3 सामन्यांमध्ये डॅनियल सॅम्सची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. मागच्या तिन्ही सामन्यांमधली ही कामगिरी बघता त्याला आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये मुंबईकडून संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयपीएल लिलावात डॅनियल सॅम्सची बेस प्राईज 1 कोटी रुपये होती, त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई आणि लखनऊ यांच्यात स्पर्धा रंगली होती. पण मुंबईने त्याला 2.60 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement