SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सॲप होणार आणखी मजेशीर, आता तुम्हाला ‘या’ लोकांनाही मेसेज पाठवता येणार, वाचा नवीन फिचरबद्दल..

लोकप्रिय इंस्टंटन्ट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप अनेक मोठ्या समस्येवर नेहमीच काम करत असते. आता एका नवीन फीचरवर व्हॉट्सॲप (WhatsApp) काम करत असल्याचे दिसत आहे. व्हॉट्सॲप ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार, आता व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवर मेसेज पाठवण्यावर काम करत आहे. त्यामुळे आता अनेकांचा नंबर सेव्ह करण्याचा ताण वाचणार आहे.

व्हॉट्सॲपवर यापूर्वी कोणाला मेसेज पाठवायचा असेल तर समोरच्या व्यक्तीच्या नंबर सेव्ह करावा लागत असे. आता व्हॉट्सॲप अनेक दिवसांपासून काम करत असलेल्या या फीचरला लवकरच लॉन्च करतंय. सध्या यामध्ये असलेल्या काही त्रुटींवर कंपनी काम करत असल्याचं कळतंय.

Advertisement

अहवालात असे दिसून येत आहे की आपण सेव्ह न केलेल्या नंबरवर टॅप केल्याने काही पर्याय चॅट बबलमध्ये ओपन होईल जे वापरकर्ते ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे ती व्यक्ती व्हॉट्सॲपवर असल्यास त्या व्यक्तीशी चॅट करण्याचा पर्याय देईल. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना या सेव्ह न केलेल्या नंबरवर टॅप केल्यावर कॉल करण्याची आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याचा पर्यायदेखील मिळणार असल्याची माहिती आहे. गेली अनेक दिवसांपासून व्हॉट्सॲपचं यावर काम सुरू आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणता एखादा नवीन नंबर मोबइलमध्ये सेव्ह न करता थेट व्हॉट्सॲपवर चॅट करता येणार आहे.

कंपनीने अद्याप नवीन फिचर्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, भविष्यातील अपडेटमध्ये ते लवकरच दिसतील अशी लोकांना अपेक्षा आहे. तसेच, WABetaInfo च्या अहवालानुसार, तुम्हाला एकाच वेळी अनेक ग्रूप्सला एक मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही, अशी मर्यादा घालून आता पाच गटांऐवजी तुम्ही आत्ता एक मेसेज फॉरवर्ड करू शकता, नवीन फीचरनुसार एकावेळी फक्त एकाच ग्रुपला मेसेज फॉरवर्ड करण्याची व्हॉट्सॲप परवानगी देईल. याशिवाय व्हॉट्सॲपने गेल्या आठवड्यात व्हॉईस मेसेजिंगसाठी अनेक नवीन फीचर्सची घोषणा केली. फेसबुकच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मचा दावा आहे की या नवीन फिचर्समुळे युजर्सना जवळच्या लोकांशी संवाद साधणे आणखी सोपं होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement