SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका. हट्टीपणा नको पण जिद्द हवी. नियोजन करून प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल. तज्ज्ञांचा सल्ला लाभदायी ठरेल. ओव्हरटाईम करावा लागू शकतो. समस्येच्या वेळी मदत करणाऱ्यांना विसरू नये. आज कोणाच्याही आधी स्वत:च्या भल्याचा विचार करा.

वृषभ (Taurus): वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. घरातील कुरबुरी मध्ये लक्ष घाला. स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. ओळखीतल्यांसाठी वेळ काढावा लागेल. घरच्यांसोबत वेळ चांगला जाईल. चिंता करणे कमी करा. आलेला क्षण साजरा करायला शिका. व्यक्तिमत्वात काही भावनिक बदल जाणवतील. मनाला वाटेल ते कराल.

Advertisement

मिथुन (Gemini) : सामुदायिक वादापासून दूर राहावे. धार्मिक स्थळांना भेट द्याल. ध्यान धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी. शांततेचा मार्ग स्वीकारावा. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. दिवस मजेत जाईल. नियोजन हिताचे. प्रवासाचा योग संभवतो. एखाद्या अशा व्यक्तीशी खूप मनोरंजक भेट होईल ज्याला आयुष्यभर लक्षात ठेवाल. कुटुंबासह बाहेर जेवायला जावं वाटेल.

कर्क (Cancer) : काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चांचल्या जाणवेल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. मनात अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा. कुटुंबातील संकटात सापडलेल्या सदस्याला मदत करा.

Advertisement

सिंह (Leo) : वेळेचे बंधन पळावे लागेल. श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. वाद टाळणे, शब्द विचारपूर्वक वापरणे हिताचे. जुन्या ओळखींचा फायदा होईल. ज्या गोष्टींचा तुमच्यावर खूप वाईट परिणाम होत होता, त्या गोष्टीच नाहीशा होतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.

Advertisement

कन्या (Virgo) : परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत. ज्येष्ठांची तब्येत सांभाळा. घरच्यांना वेळ द्या. नियोजन हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. दिवस गोंधळ आणि तणावाने भरलेला असेल. ऑफिसमध्ये खूप कामाच्या दबावाला सामोरे जावे लागू शकते.

तुळ (Libra) : कौटुंबिक सौख्यात भर पडेल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल. सर्वांशी गोडीने वागाल. आर्थिक नियोजन आवश्यक. निर्णय विचारपूर्वक घ्या. दूरदृष्टी हिताची. बाईकने प्रवास न करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा काही तांत्रिक समस्या उद्भवू शकतात. क्रोधाला आवर घालणे आवश्यक आहे. आर्थिक प्रश्न सुटतील.

Advertisement

वृश्‍चिक (Scorpio) : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका. तब्येत जपा. आहारविहार जपून करा. चुकीची कृती करणे टाळणे हिताचे. कायदा पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबासह सहलीचे नियोजन केले पाहिजे. आजचा दिवस आनंदात जाईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणे आणि प्रसंगावधान राखणे हिताचे. नेतृत्वाची संधी मिळेल. संधीचा लाभ घ्या. आपली बाजू समजावून सांगण्यात वेळ वाया घालवू नये.

मकर (Capricorn) : हौस पूर्ण करून घ्याल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल.दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. काम-धंद्यात वाढ होईल. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. मन आज जास्त आनंदी होईल. व्यापारात वाढ होईल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथीची काळजी घ्या. धनलाभ होईल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा. क्षमता ओळखून निर्णय घेणे आणि कृती करणे हिताचे. कायदे पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे. नियोजन हिताचे आहे. भावंडांच्या भेटी होतील. मालमत्तेच्या कामाविषयी प्रगती होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

मीन (Pisces) : दिवसभर कामात व्यग्र राहाल. पित्त विकार बळावू शकतात. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. विविध प्रकारचे लाभ होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल.

Advertisement