SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ना टोल कंपनी पैसे देतेय ना ड्रायव्हरची कंपनी; बघा, ड्रायव्हरला कसा आणि किती लाखाला लागला चुना

मुंबई :

माणूस आता टेक्नोलॉजीच्या बऱ्यापैकी आहारी गेला आहे, टेक्नोलॉजीचा माणसाला जेवढा फायदा होत नाही त्यापेक्षा जास्त तोटा होता, अशा घटना अनेकदा समोर येत असतात. भारतातही टोल वसूली करण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून फास्टॅग सारखी उत्तम आणि टेक्नोलॉजी बेस यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. मात्र टेक्नोलॉजी कधी आपल्याला झटका देईल, हे काही सांगता येत नाही. असाच प्रकार एका ड्रायव्हरसोबत घडला आहे.

Advertisement

आता ही घटना ऑस्ट्रेलियातील असली तरीही असे प्रकार भारतातही घडत असतात. तर जेसन क्लिंटन नावाच्या ड्रायव्हरकडून तब्बल 43 लाखांचा टोल त्याच्या खात्यातून कापला गेला आहे. न्यू साउथ वेल्सच्या टोल रोडवरून जात असताना त्यांच्या खात्यातून 75 हजार रुपये ($1000) टोल टॅक्स म्हणून कापले जातात. सोमवारी, कंपनीने टोल रस्त्यावरून गेल्यावर त्याच्या खात्यातून तब्बल $17,000 म्हणजेच 43 लाख कापले.

आता किस्सा झाला असा की, टोल कंपनीने टोल कितीतरी अधिक पटीने कापला आणि वरून पैसे परत देण्यास नकार दिला. मात्र टोल कंपनीने त्याला क्रेडीट दिले आहे. जेव्हा जेव्हा तो या रस्त्यावरून जाईल. तेव्हा तेव्हा या 43 लाखांचे कुपन्स तो वापरू शकतो. जर जेसन कधीच त्या टोल रस्त्यावरून गेला नाही, तर त्याच्या कुपनमध्ये ठेवलेले 43 लाख रुपये वाया जातील. ‘क्रेडिट नोटचा मला काही उपयोग नाही. मला माझे पैसे परत हवेत’, अशी मागणी जेसन याने केली आहे.

Advertisement

आता जेसनची मूळ कंपनी पण त्याला मदत करत नाहीये कारण यात त्यांचा काहीच दोष नाही. टोल वाली कंपनी पण पैसे देण्याऐवजी क्रेडीट देत आहेत. भारतात पण अनेकदा असे किस्से घडत असतात. पण जेसनला जेवढे पैसे कापले जातात तेवढ्या किमतीत आपल्याकडे 2-2 ट्रक येतील.

Advertisement