SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाबो… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळतो ‘एवढा’ पगार; वाचा, आमदार, खासदार व इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना किती असतो पगार

जगाच्या पाठीवर कुठेही जा, माणसाला जगण्यासाठी पैसा आवश्यक असतोच. पैसा म्हणजे सर्वस्व नसले तरीही गरजेला पैसा लागतोच लागतो. आता आपण नगरसेवक वगैरे मंडळी बघतो, जे एकदा निवडून आले तरी बक्कळ श्रीमंत होतात. त्यांची मुलेही पुढे श्रीमंत होतात. आमदार, खासदार असले तर त्यांचा नादच खुळा असतोय भाऊ…

आता आमदार खासदारांनाही पगार असतात, हे आपल्या मनीध्यानी पण नसेल. पण आमदार, खासदाराच काय घेऊन बसलात, इथे मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान सगळ्यांना पगार असतोय.

Advertisement

भारतात सर्वात जास्त पगार असलेले मुख्यमंत्री कोण असतील? जरा डोकं लावा… तुम्हाला विचार पण येणार नाही असा माणूस आहे. के. चंद्रशेखर जे तेलंगानाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना तब्बल 4.10 लाख रुपये पगार मिळतो. महिन्याला बर का…

त्याखालोखाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4 लाख रुपये पगार मिळतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर युपीचे योगी आदित्यनाथ यांना 3 लाख 65 हजार पगार मिळतो. आता दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. वाढला असला तर नेमकं काही सांगता येत नाही.

Advertisement

आणि 4 नंबरला येतात आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.. त्यांना 3 लाख 40 हजार पगार मिळतो. महाराष्ट्रातील आमदारांना महिन्याकाठी तब्बल 1 लाख 82 हजार वेतन मिळतं.  तर  महागाई भत्ता 21 टक्के म्हणजेच 30  हजार 974 रुपये इतका मिळतो. फोन बिल, टपाल, संगणक चालक अशा अन्य सुविधांसाठीही त्यांना भत्ते दिले जातात. असं मिळून त्यांचं निव्वळ एकूण वेतन 2 लाख 40 हजार 973 रुपयांच्या वर जातं. भत्ते मिळून खासदारांना अडीच लाखांपर्यंत एकूण वेतन मिळते.

मुख्यमंत्री वेतन आणि राज्य याच्याविषयी माहिती खाली :-  

Advertisement
राज्य वेतन
तेलंगाना रुपये 4,10,000
दिल्ली रुपये 3,90,000
उत्तर प्रदेश रुपये 3,65,000
महाराष्ट्र रुपये 3,40,000
आंध्र प्रदेश रुपये 3,35,000
गुजरात रुपये 3,21,000
हिमाचल प्रदेश रुपये 3,10,000
हरियाणा रुपये 2,88,000
झारखंड रुपये 2,72,000
मध्य प्रदेश रुपये 2,55,000
छत्तीसगढ़ रुपये 2,30,000
पंजाब रुपये 2,30,000
गोवा रुपये 2,20,000
बिहार रुपये 2,15,000
पश्चिम बंगाल रुपये 2,10,000
तमिलनाडु रुपये 2,05,000
कर्नाटक रुपये 2,00,000
सिक्किम रुपये 1,90,000
केरल रुपये 1,85,000
राजस्थान रुपये 1,75,000
उत्तराखंड रुपये 1,75,000
ओडिशा रुपये 1,60,000
मेघालय रुपये 1,50,000
अरुणाचल प्रदेश रुपये 1,33,000
असम रुपये 1,25,000
मणिपुर रुपये 1,20,000
नगालैंड रुपये 1,10,000
त्रिपुरा रुपये 1,05,500

 

Advertisement