SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राऊतांचा पलटवार, सोमय्यांवर केला ‘एवढा’ मोठा आरोप, नेमकं प्रकरण काय..?

राज्यातील अनेक मंत्र्यांवर, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर आता नवा आरोप केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला निधी सोमय्यांनी गुल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीच्या आधारे हे प्रकरण समोर आले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. सोमय्या यांचा हा एक प्रकारे देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी आता करायला हवा, असं राऊत म्हणाले. सोमय्या हे सीए असल्याने, त्यांना माहीत आहे की अशा पद्धतीने आलेला पैसा कसा पचवायचा, या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Advertisement

पुढे ते म्हणाले, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. पण आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांना जमा केलेला पैसा राज्यपाल कार्यालयात पोहोचलाच नाही, अशी धक्कादायक माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून सदर प्रकरणात माहिती मागवली होती आणि असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं आरटीआयमध्ये उघड करण्यात आलं आहे.

देशाच्या नागरिकांच्या भावनांशी खेळून, देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावर हा निधी जमवण्यात आला आणि त्याचा अपहार करण्यात आला. त्यामुळे सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असेही राऊत यांनी म्हटले. यामध्ये सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेतेदेखील सहभागी आहेत, असं राऊत म्हणाले. आता राऊत-सोमय्या यांच्यामध्ये मोठे वाद निर्माण होत जातील आणि पक्षांमध्येही काही गोष्टींची तीव्रता आणखी वाढेल यात शंकाच नाही.

Advertisement

आयएनएस विक्रांत या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसै जमा केले होतो. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला होता. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement