SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुन्हा कोसळणार अस्मानी संकट: सिंधुदूर्ग जिल्ह्यात धुंवाधार पावसाला सुरवात; ‘या’ 6 जिल्ह्यांतही बरसणार

मुंबई :

कधी उन तर कधी पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. हवामान अनपेक्षितपणे वारंवार बदलत आहे, असे चित्र सगळीकडेच आहे. अवकाळी पावसामुळे राज्याला झोडपून काढलं आहे. सध्या काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसत आहेत तर कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Advertisement

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात 4 ते 7 एप्रिलच्या दरम्यान गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे. आतापर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. राज्यात 4 ते 7 एप्रिलच्या दरम्यान गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे. आतापर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे.

Advertisement

आजही सकाळपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात रात्री आणि पहाटे वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग परिसरात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार असून चा सर्वाधिक फटका आंबा फळपिकाला बसणार आहे.

Advertisement