SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महागाईचा ट्रिपल अटॅक; वाचा, पेट्रोलसोबत अजून काय काय झाले महाग

मुंबई :

येत्या काही दिवसांत महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Hike) सातत्याने वाढत आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

80 पैशांच्या वाढीसह देशातील अनेक ठिकाणी आजपासून पेट्रोल 120 रुपयांच्या पार गेले आहे. देशात सगळ्यात महाग पेट्रोल महाराष्ट्रात विकले जात आहे. परभणी येथे पेट्रोलची 122 रुपयांनी विक्री होत असून परभणी हे देशातील इंधन विक्रीचे सगळ्यात महाग ठिकाण ठरले आहे. रोज होणारी इंधन दरवाढ डबल अटॅक करणारी ठरत होती. आता मात्र महागाईचा ट्रिपल अटॅक झालेला आहे.

अवघ्या पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र हा दिलासा अल्पायुषी ठरला. कारण या निर्णयानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकदा सीएनजी, पीएनजी दरवाढीची कुऱ्हाड ग्राहकांवर कोसळली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या दोन आठवड्यांत तेल कंपन्यांनी हळूहळू पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोजच वाढ करून सर्वसामान्यांना झटका देत आहेत. गेल्या 2 आठवड्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9 रुपये 20 पैशांनी वाढ झाली आहे. दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 13 वेळा वाढ झाली आहे. एक एक करून प्रत्येक गोष्टीत महागाई होत असताना केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसल्याची भूमिका घेत आहे. जनतेने अजून किती दिवस महागाईचा मारा सहन करायचा, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

शहर पेट्रोल डीज़ल
दिल्ली 105.41 96.67
कोलकाता 115.12 99.83
मुंबई 120.51 104.77
चेन्नई 110.85 100.85
स्रोत : इंडियन ऑयल

 

Advertisement