SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘त्या’ शहरात सापडले ओमिक्रोनचे नवे रूप; सगळीकडे उडाली खळबळ

मुंबई :

कोरोना आणी ओमिक्रोनविषयी नवनवीन माहिती समोर येतच असते. अजूनही कोरोना आणि ओमीक्रोन संपलेले नाहीत. मात्र रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट आढळून आली आहे. असे असले तरी एक गंभीर आणि अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रोनच्या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे.

Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रोनचा नवीन व्हेरीयंट XE या विषाणूने मुंबईत शिरकाव केलेला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, अद्याप या विषाणूचि एकच केस मुंबईत सापडली आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानेही ट्वीट करून ही महत्वाची माहिती समोर आणली आहे.

कोरोना गेला, अशा चर्चा जेव्हा जेव्हा सुरु होतात, तेव्हा अशी काहीतरी एखादा विषाणू पुन्हा समोर येते आणि लोकांमध्ये भीती दाटते, असे यापूर्वी अनेकदा घडले आहे. ज्या भागात हा नवीन रुग्ण सापडला आहे, त्या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण नसले तरीही खबरदारी प्रत्येकच जण घेत आहे.

Advertisement

हा विषाणू किती घातक आहे? त्याची लक्षणे काय? तो पसरण्याच्या शक्यता किती आहेत? असे अनेक प्रश्न समोर असले तरीही याबाबत जास्त माहिती अजून समोर आलेली नाही. कोरोनाच्या आरोग्य आणि आर्थिक संकटातून लोक सावरत असताना या बातमीने पुन्हा नव्या विषाणूने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

Advertisement