SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी संपाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; एसटी कामगारांना दिला ‘अल्टिमेटम’..!

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. अखेर एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबई हायकोर्टाने आज (ता. 6) एसटी संपाबाबत मोठा निर्णय दिला..

हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटीचे शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला होता. सरकारतर्फे ही माहिती हायकोर्टात देण्यात आली. त्यानंतर आता न्यायालयाने एसटी कामगारांनी कामावर परतण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी हायकोर्टाने एसटी कामगारांना 15 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. तोपर्यंत, एसटी कामगारांना कामावरून काढू नका. मात्र, त्यानंतर कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकतं, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. पुढील 10 दिवसांत कामावर हजर न झाल्यास, आता कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

शिवाय, पुढील 4 वर्षे राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे निर्णय घेईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत उद्या (ता. 7) सकाळी 10 वाजता पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार असून, सरकार नि एसटी कामगारांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. उद्या कोर्टाकडून आणखी कोणते आदेश दिले जातात, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

कामावरुन काढू नका
एसटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढू नये, अशी सूचना न्यायालयाने महामंडळाला केली. “संपकरी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घ्या. त्यांनी आंदोलन सुरू केलं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्यांना कामावरून काढून त्यांच्या जगण्याचे साधन हिरावू नका… मात्र, 15 तारखेपर्यंत कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास, महामंडळ कारवाईसाठी मोकळे असेल, असेल, असेही न्यायालयाने नमूद केले..

“एसटी कर्मचाऱ्यांनी आता तरी तातडीनं कामावर रूजू व्हावे. तुमच्या समस्या शांतपणे ऐकल्या. कधीही तुमच्यावर कारवाईचा आदेश दिलेला नाही. त्यामुळे आता तरी कामावर रुजू व्हा..” असं आवाहन कोर्टाने कर्मचाऱ्यांना केलं.

Advertisement

वकिल सदावर्ते काय म्हणाले..?
दरम्यान, हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की “एसटी कामगारांसाठी तुम्ही काय करणार, असं कोर्टाने विचारलं. आम्ही त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाला चॅलेंज करणार आहोत. सरकारने आमदारांचा अवमान केला. कष्टकऱ्यांची नीति काय असेल, हे कोर्टापुढे मांडणार आहोत.”

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement