SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आठवी ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरु..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई इथे विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना (Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आलीय.

या नोकरभरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. या नोकर भरती प्रक्रियेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

या पदांसाठी भरती

 • लघुटंकलेखक (Shorthand Writer)
 • लिपिक (Clerk)
 • वाहनचालक (Driver)
 • शिपाई (Peon

शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार

Advertisement

लघु टंकलेखक

 • इच्छूक उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवीधर / एमएस सीआयटी (Any Graduate / MSCIT) शिक्षण झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.
 • पदांनुसार टायपिंग, शॉर्ट हॅन्डचं शिक्षण झालेलं असावं
 • पदभरतीच्या सर्व अटी- शर्थी मान्य केलेल्या असणं आवश्यक.
 • पगार – 25,000/- रुपये प्रतिमहिना

लिपिक

Advertisement
 • इच्छूक उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवीधर / एमएस सीआयटी (Any Graduate / MSCIT) शिक्षण झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.
 • पदांनुसार टायपिंग, शॉर्ट हॅन्डचं शिक्षण झालेलं असावं
 • पदभरतीच्या सर्व अटी- शर्थी मान्य केलेल्या असणं आवश्यक.
 • पगार – 23,000/- रुपये प्रतिमहिना

वाहनचालक

 • इच्छूक उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावीपर्यंत शिक्षण.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.
 • पदांनुसार टायपिंग, शॉर्ट हॅन्डचं शिक्षण झालेलं असावं
 • पदभरतीच्या सर्व अटी- शर्थी मान्य केलेल्या असणं आवश्यक.
 • पगार – 21,000/- रुपये प्रतिमहिना

शिपाई

Advertisement
 • इच्छूक उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आठवीपर्यंत शिक्षण.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.
 • पदांनुसार टायपिंग, शॉर्ट हॅन्डचं शिक्षण झालेलं असावं
 • पदभरतीच्या सर्व अटी- शर्थी मान्य केलेल्या असणं आवश्यक.
 • पगार – 20,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

इथे करा अर्ज –  मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. 9, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049.

Advertisement

ऑनलाईन अर्जासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –  https://mahatmaphulecorporation.com/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022

Advertisement

नोकरभरतीबाबत सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

Advertisement