SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

2 सामने हारल्यानंतर रोहितची ‘खेळी’; ‘गेम’ करणारा ‘तो’ खेळाडू आज दिसणार मैदानावर

मुंबई :

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग दोन्ही सामन्यात पराभव पत्करावे लागले असून त्यांचा तिसरा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स बरोबर (Kolkata Knight Riders)  होणार आहे. आजवर कधीच पाहिला नव्हता, असा पराभव मुंबई इंडियन्सने IPL2022 च्या सुरुवातीलाच पाहिला आहे. आता सामने हारल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने एक मोठी खेळी खेळली आहे. आजवर दोन्ही सामन्यात एकदाही मैदानावर न आलेला आणि पाहिजे तशी गेम फिरवणारा खेळाडू मैदानात उतरवला जाणार आहे.

Advertisement

या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहितने मोठी रणनिती खेळली आहे. रोहितने टीममध्ये एका खेळाडूची एन्ट्री केली आहे. त्यामुळे टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे. या खेळाडूमध्ये सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता आहे. टीममध्ये आक्रमक बॅट्समन सूर्यकुमार यादवची एन्ट्री झाली आहे.  कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार खेळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

मात्र आता तरीही मुंबई इंडियन्सची डोकेदुखी चांगलीच वाढणार असल्याचे दिसत आहे. कारण जशी इकडच्या टीममध्ये सुर्यकुमार यादवची एन्ट्री होणार आहे. तशीच केकेआरच्या संघातून जगातील अव्वल गोलंदाज असलेला पॅट कमिन्स हा मैदानात उतरणार आहे.

Advertisement

त्यामुळे आता मुंबई इंडियन्सविरुद्ध आता केकेआरचा हा सामना अतिशय रंगतदार होणार आहे. मुंबई इंडियन्सला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल, नाहीतर त्यांच्यावर गुणतालिकेत तळाला जाण्याची नामुष्की ओढवू शकते. कोलकाताने या मोसमात खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. आता सूर्या पुनरागमनासाठी सज्ज आहे. या सामन्याआधी सूर्याने नेट्समध्ये कसून सरावही केला. त्यामुळे सूर्याची कोलकाता विरुद्धच्या सामन्यात एन्ट्री निश्चित मानली जात आहे.

Advertisement