SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने खरेदीची सुवर्णसंधी, सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण…!

सोने खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी बातमी बातमी आहे.. सध्या सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गेल्या सलग 3 दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय.. घसरणीचा सिलसिला आजही (ता. 6) कायम होता.. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

सोन्यासह चांदीच्या दरातही आज (बुधवारी) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.. ‘मल्टी कमॉडिटी एक्सचेंज’वर (MCX) सोने आज 41 रुपयांनी स्वस्त झालं. त्यामुळे आज सकाळी सोने 51,330 रुपयांवर ट्रेड (Gold Price Today) करीत होते.

Advertisement

दरम्यान, चांदीच्या भावातही आज मोठी घट झाल्याचे दिसून आले.. चांदीचा दर प्रति किलोमागे 222 रुपयांनी घसरला.. त्यामुळे चांदी 65,976 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होती.

महाराष्ट्रात सोन्याचे दर काहीसे स्थिर असल्याचे चित्र आहे.. प्रमुख शहरातील सोन्याचे दर जाणून घेऊ या..

Advertisement
  • मुंबई- 22 कॅरेट – 47 हजार 800, 24 कॅरेट- 52140 रुपये प्रति तोळा
  • पुणे – 22 कॅरेट – 47 हजार 850, 24 कॅरेट – 52190 रुपये प्रति तोळा
  • नागपूर- 22 कॅरेट – 47 हजार 850, 24 कॅरेट – 52190 रुपये प्रति तोळा

रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारावर विपरित परिणाम झाला आहे. कच्च्या तेलापासून खाद्यतेलापर्यंत अनेक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सातत्याने सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आता तुम्हाला घरबसल्या सोन्याचे दर जाणून घेता येणार आहेत. त्यायासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल, ज्यात तुम्ही सोन्याचे नवे दर जाणून घेऊ शकता.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement