SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘त्या’साठी पवारांना मोदींचे पाय पकडायला पाठवले; बघा, कुणी केला हा आरोप

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्याविरुद्ध प्रत्यक्षात कारवाई काल करण्यात आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आज राऊत यांनी ‘मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत, असे म्हटले. यावर आता विविध प्रतिक्रिया येत असताना भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अतिशय टोकाला जाऊन टीका केली आहे.

Advertisement

‘राऊत यांनी स्वतःसाठी पवार साहेबांना मोदी साहेबांचे पाय पकडायला पाठवले, असा आरोप राणे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेत आपण कशासाठी भेटलो, याचा खुलासा केला. या भेटीत संजय राऊत यांच्या कारवाईबाबत मोदींना सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी राणे यांनी ‘पवारसाहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेतून अजून किती वेळा पडणार आहात’, असा टोला पवारांना लगावला.

Advertisement

गेल्या 15 दिवसांत शिवसेनेच्या तीन नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली. दरम्यान, मंगळवारी (5 एप्रिल) रोजी शिवसेनेचे धडाडीचे नेते आणि राज्यसभा खासदार यांच्या दादरमधील घरावर टाच आणली. याशिवाय त्यांच्या जवळच्या असलेल्या प्रवीण राऊत आणि पाटकर यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्यात आली होती. ही कारवाई झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार मोदींची भेट घेण्यासाठी गेले असल्याकारणानं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

Advertisement