SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डीझेल नंतर ‘या’ दैनंदिन वस्तूंचे 16 टक्क्यांनी वाढले भाव; बघा, कोणकोणत्या वस्तू झाल्या महाग

मुंबई :

आजवर 12 पेक्षा जास्त वेळा पेट्रोल-डीझेलमध्ये भाववाढ झाली आहे. जवळपास 10 रुपयाने इंधन महाग झालं असून काही शहरात 120 रुपयांनी पेट्रोल विकलं जात आहे. तसेच CNG ही 2 वेळा वाढला आहे. दुधाचेही भाव कडाडले आहेत. आणि आता अशातच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ देणारी बातमी समोर आली आहे.

Advertisement

साबण, मॅगी, कॉफी, मसाले, तांदूळ अशा अनेक खाण्या-पिण्याच्या आणि दररोज वापरायच्या गोष्टींचे दर वाढले असताना, आता डाळीचे दर वधारले आहेत. मागील जवळपास एका महिन्यात दाळीच्या दरात 16 टक्क्यांची वाढ (Pulses Rate Increased) झाली आहे. इंधन दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे परिणामी सगळ्याच बाबतीत महागाई वाढताना दिसत आहे.

वाहन, वाहतूक, बांधकाम तसेच घाऊक व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर महागाईला सामोरे जावे लागत आहे. डाळ, भाज्या, फळांसह विविध खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे दर वाढलेले आहेत. हॉटेल क्षेत्राचीही हीच अवस्था झालेली आहे.

Advertisement

देशात पेट्रोल – डिझेल दर वाढल्याने या खाद्य सामग्रीचे दर वाढले आहेत. त्याशिवाय शाळा, कॉलेज, हॉटेल, रेस्टोरंट ओपन झाल्याने याच्या मागणीतही वाढ झाली आहे. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी ब्रिटानिया यावर्षी आपल्या बिस्किटांच्या किमतीत 7 टक्क्यांची वाढ करू शकते. हिंदुस्तान यूविलिव्हर लिमिटेडने ब्रू कॉफी पावडरच्या किमती 3 ते 7 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. ब्रू गोल्ड कॉफी जार तीन-चार टक्क्यांनी आणि ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊच 3 ते 6.66 टक्क्यांनी महागले आहेत. त्याचबरोबर ताजमहाल चहाची किंमतही 3.7 वरून 5.8 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Advertisement