SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 6 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ संजय राऊत यांची तक्रार, शिवसेनेच्या नाराजीनंतर कार‌वाईला वेग; ईडी अधिकाऱ्यांची एसआयटी (मुंबई पोलिसांचे 5 अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक) चौकशी होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

✒️ भारताविरोधात अपप्रचार करणारे 22 यूट्यूब चॅनल, 4 पाकिस्तानी न्यूज चॅनल, 3 ट्विटर खाते, एक फेसबूक अकाउंट व एक न्यूज वेबसाईट ब्लॉक, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची धडक करवाई

Advertisement

✒️ मनसेची पुढच्या जाहीर सभेची घोषणा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 9 एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा, विरोधकांच्या प्रत्येक आरोपांवर, प्रश्नांवर देणार उत्तर

✒️ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून केला पराभव, कार्तिक व शाहबाजच्या धडाकेबाज खेळीने 170 धावांचे लक्ष्य आरसीबीने सहज केले पार

Advertisement

✒️ दिल्लीत शरद पवारांच्या घरी सर्वपक्षीयांसोबत स्नेहभोजन, नितीन गडकरी, संजय राऊत यांचीही उपस्थिती, सोबतच भाजपच्या आमदारांनाही आमंत्रण

✒️ देशातील सर्वोच्च 90 तंत्रशिक्षण संस्थांत सर्वाधिक विद्यार्थी तेलगू भाषिक, महाराष्ट्र पाचव्या स्थानावर, तंत्रशिक्षण संस्थांत उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक – अहवाल

Advertisement

✒️ गुजरातमध्ये तयार होणार भारताचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक, अमेरिकी गुजराती कंपनी ट्रायटन दिवाळीपर्यंत लाँच करणार, 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती

✒️ काँग्रेसच्या नाराज आमदारांची काल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी भेट, काँग्रेस मंत्र्यांविरोधात केल्या अनेक तक्रारी; प्रत्येक आमदाराशी सविस्तर चर्चा करणार, सोनिया गांधींचे नाराज आमदारांना आश्वासन

Advertisement

✒️ परदेशी नागरिकांच्या नावावर बेकायदा कंपन्यांचे हस्तांतर; मुंबईतील 40 कंपन्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास; चिनी नागरिकांसह परदेशातील 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

✒️ Hyundai Creta Knight Edition लवकरच होणार लाँच, अनेक फीचर्स होणार अपडेट; ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनची सुरुवातीची किंमत 13.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement