SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराट कोहलीचा कुंबळेबाबत धक्कादायक गौप्यस्फोट..! वादामागील खरं कारण अखेर आलं समोर..!

भारतीय क्रिकेट नि वादाचे नातं तसं जूनंच.. कधी खेळाडूंमध्ये, कधी खेळाडू व कॅप्टनमध्ये, तर कधी कधी कॅप्टन नि कोचमध्ये रुसवे-फुगवे पाहायला मिळाले.. त्यातून काहींची थेट संघाबाहेर गच्छंती झाली, तर काहींची क्रिकेट कारकिर्दही संपली..!

भारतीय क्रिकेटमधील एका वादाने अनेकांना धक्का बसला होता. तो म्हणजे, माजी कप्टन विराट कोहली नि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील भांडण.. त्यावेळी विराटपुढे कुंबळेचा टिकाव लागला नाही नि त्याला प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. त्यानंतर विराटचे आवडते कोच रवि शास्री यांची पुन्हा निवड झाली होती..

Advertisement

विराट व कुंबळेमधील हा वाद माध्यमांनी चांगलाच रंगवून रंगवून सांगितला. मात्र, विराट असो वा कुंबळे.. आतापर्यंत कुणीही त्यावर स्पष्टीकरण दिलं नव्हतं.. त्यामुळंच त्याचं गुढ वाढलं होतं.. आता इतक्या वर्षांनी या वादाबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.. त्यावेळी नेमकं काय झालं होतं, हे पुढं आलं आहे..

नेमकं काय झालं होतं..?

Advertisement

‘आयपीएल’मधील फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर, 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विनोद राय यांची ‘क्रिकेट ऑफ एडमिनिस्ट्रेटर’ (COA) म्हणून निवड करण्यात आली होती. राय यांच्या नेतृत्वाखालील समितीने 3 वर्षे भारतीय क्रिकेटला चालवले. त्याच काळात कुंबळेची मुख्य कोच म्हणून निवड झाली होती..

विनोद राय यांनी ‘नॉट जस्ट ए नाइट वॉचमन : माय इनिंग्स इन द बीसीसीआय’ या आपल्या पुस्तकात ‘बीसीसीआय’मध्ये काम करतानाचे अनुभव कथन केले आहेत. त्यात त्यांनी विराट व कुंबळे यांच्यातील वादावरही भाष्य केलंय.

Advertisement

विराट काय म्हणाला..?
कोहली व कुंबळे यांच्यातील वादामुळे प्रशासकीय समितीही हैराण झाल्याचे सांगून विनोद राय आपल्या पुस्तकात म्हणतात, की “कर्णधार आणि कोच यांच्यातील नाते ठीक नव्हतं.. कोहली व संघ व्यवस्थापनाशी बोललो, तेव्हा लक्षात आलं, की कुंबळे खूपच अनुशासक होते. त्यामुळे संघातील सदस्य त्याच्याबाबत खुश नव्हते.”

विराटच्या मते, ज्या पद्धतीने कुंबळे युवा खेळाडूंसोबत काम करीत होते, त्यामुळे खेळाडू फार घाबरलेले असत.., असंही राय यांनी आपल्या या पुस्तकात नमूद केलं आहे.

Advertisement

कुंबळे काय म्हणाला..?
“आम्ही कुंबळेसोबतही चर्चा केली. ज्या पद्धतीने घटना घडत गेल्या, त्यामुळे कुंबळे फार नाराज झाला होता. कर्णधार नि संघाला इतके महत्त्व दिलं जाऊ नये, असं त्याचं मत होतं. मुख्य प्रशिक्षकाचे कर्तव्य असते, की त्याने संघात अनुशासन नि प्रोफेशनलिज्म आणावा. एक सिनिअर असल्याने खेळाडूंनी त्याच्या मताचा आदर करावा..”

तत्कालीन ‘सीईओ’ राहुल जोहरी व कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनीही कोहली-कुंबळेसोबत चर्चा केली. मात्र, तोपर्यंत त्यांच्यातील मतभेद टोकाला गेले होते. त्यानंतर सचिन, गांगुली व लक्ष्मण यांच्या समितीने लंडनमध्ये कुंबळे व कोहलीसोबत 3 दिवस वेगवेगळी चर्चा केली व नंतर कुंबळेलाच पुन्हा ‘हेड कोच’ बनविण्याची शिफारस केली, पण कुंबळेने पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय आमच्यासाठी धक्का होता, असं विनोद राय पुस्तकात म्हणतात.

Advertisement

‘कुंबळेने आपल्या राजीनाम्यात असं म्हटलं होतं, की कर्णधाराला माझी कोचिंग स्टाईल आवडत नाही, तसंच त्याला मी हेड कोच म्हणून कायम राहण्यावर आक्षेप आहे. त्यामुळे मी हैराण आहे, कारण मी कायमच कर्णधार नि कोच यांच्यातील सीमांचा सन्मान केला आहे..’ असंही पुस्तकात म्हटलं आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement