SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर सरकारचा उपाय…! देशात राबवणार ‘हे’ अनोखे धोरण..!

रोजच्या इंधन दरवाढीमुळं सामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय.. शिवाय पुढील काही दिवस सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार असल्याचे बोललं जातंय.. मात्र, सरकारनं वाढत्या इंधन दरवाढीवर एक उपाय आणला आहे..

सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचं दिसतं.. अर्थात, त्यात सर्वाधिक मागणी इलेक्ट्रिक दुचाकींना आहे, कारण घरच्या घरी इलेक्ट्रिक दुचाकी सहज चार्ज करता येते.. त्या तुलनेत ‘इलेक्ट्रिक कार’ चार्जिंगची मात्र अडचण होते.. देशात पुरेसे ‘चार्जिंग स्टेशन’ नसल्याने इलेक्ट्रिक कारचे मार्केट डाऊन असल्याचे पाहायला मिळते..

Advertisement

इलेक्ट्रिक कारबाबत (Electric car) ग्राहकांची मोठी अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ‘नवीन बॅटरी स्वॅपिंग’ धोरण जाहीर केलं होतं. हे धोरण आता शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच ते लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ‘बॅटरी स्वॅपिंग धोरणा’ची (Battery Swapping Policy) अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांत नीति आयोग सुरू करणार आहे. हे धोरण नेमंक काय आहे, त्याचा ग्राहकांना कसा फायदा होणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘बॅटरी स्वॅपिंग धोरणा’बाबत…
प्रवासादरम्यान इलेक्ट्रिक कारची बॅटरी ‘डिस्चार्ज’ झाल्यास अडचण होत होती.. मात्र, ‘बॅटरी स्वॅपिंग धोरणा’नुसार चार्ज केलेली बॅटरी वापरलेल्या बॅटरीच्या जागी रिप्लेस करता येणार आहे, म्हणजेत, इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी या ‘डिटॅचेबल’ असतील.. बॅटरी संपल्यावर ग्राहकांना केवळ बॅटरी विकत घेता येतील, कारण स्पेअर पार्टप्रमाणे त्या कुठेही अगदी सहज उपलब्ध होतील.

इलेक्ट्रिक गाड्यांमधील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे, बॅटरी… सध्याच्या कारमध्ये बॅटरी ‘इनबिल्ट’ येते. त्यामुळे बॅटरी चार्जिंग करण्याशिवाय ग्राहकांकडे कोणताही पर्याय नसतो.. मात्र, आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीची बॅटरी निवडता येणार आहे.. कंपनीचीच बॅटरी घेण्याचं बंधन नसेल… त्यामुळे कारच्या किंमतीही कमी होतील. चार्जिंग स्टेशनवर थांबावे लागणार नाही..

Advertisement

ग्राहकांचा काय फायदा..?
– आता ग्राहकांना बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक कार विकत घेता येईल. ग्राहकांना दुसऱ्या कंपनीची बॅटरी घेता येईल..
– बॅटरीच्या अदला-बदलीच्या संपूर्ण प्रक्रियेला केवळ पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागेल.
– ‘बॅटरी स्वॅपिंग धोरणा’मुळे गाड्यांची किंमत बरीच कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे..

दरम्यान, सध्या स्वीडन, नेदरलॅंड, नॉर्वेसारख्या देशांमध्ये मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्या आहेत. त्यामुळे या देशांमध्ये आधीपासून ‘बॅटरी स्वॅपिंग धोरण’ लागू केलेलं आहे. त्याला ‘बॅटरी इज अ सर्व्हिस मॉडेल’ असंही म्हटलं जातं.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement