SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सअ‍ॅप देणार जीमेल आणि टेलिग्रामला टक्कर; आणणार ‘ते’ लाखमोलाचं फिचर

मुंबई :

ग्राहकांच्या मागणीचा विचार करून कायमच व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक अपेक्षित सुविधा देत असतात. दरवेळी काही न काही उत्तम बदल करून आपल्या ग्राहकांना जोडून ठेवण्याचे काम ते करत असतात. आताही व्हॉट्सअ‍ॅपने एक असे लाखमोलाचे फिचर आणायचे ठरवले आहे. हे फिचर आणल्यावर अनेक लोक जीमेल आणि टेलिग्राम वापरणं सोडू शकतात, असा अंदाज आहे. आपल्यापैकी अनेक लोक असे असतील ज्यांना फक्त मोठ्या व्हिडीओ किंवा इतर फाइल्स पाठवायच्या असतील तरच जीमेल आणि टेलिग्रामचा उपयोग करतात. आता हेच फिचर व्हॉट्सअ‍ॅपही देणार आहे.

Advertisement

आता व्हॉट्सअ‍ॅपने पुढचे पाऊल टाकत मोठ्या फाईल्स शेअर करता येतील, असे फिचर आणले आहे. यूजर्स एकावेळी 2GB फाइल्स शेअर करू शकतील. हे फिचर अलीकडेच बीटा व्हर्जनमध्ये पाहायला मिळाले आहे. यामुळे आता सगळे लोक मोठ्या फाइल्स शेअर करण्यासाठी जीमेल आणि टेलिग्रामकडे न वळता व्हॉट्सअ‍ॅपवरच राहतील.

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅप बीटा युजर्स सध्या 2GB पर्यंत फाइल्स ट्रान्सफर करू शकतात. हे वैशिष्ट्य Android आवृत्ती 2.22.8.5, 2.22.8.6 आणि 2.22.8.7 वर कम्पॅटिबल असेल. iOS युजर्संसाठी सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर एकावेळी फाईल पाठवण्याची मर्यादा केवळ 100MB आहे. मर्यादेत वाढ केल्याने युजर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फाईल पाठवू शकतील.

Advertisement

आजकाल अनेक स्मार्टफोन कंपन्या उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे बनवत आहेत. ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओंचा आकार मोठा होतो. व्हॉट्सअॅपवर फाइल्स पाठवण्याची मर्यादा वाढवल्यानंतर यूजर्स इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅपपद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतील. हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा यूजर बेस आणखी वाढेल.

Advertisement