SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोहित शर्मा आणि झहीर खान यांच्यातील मतभेद ‘असे’ आले चव्हाट्यावर; पराभवानंतर बघा, नेमके काय घडले?

मुंबई :

IPL 2022 आता दमदारपणे सुरु असून रोज क्रिकेटविश्वातील रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. तरीही सगळ्यात जास्त चर्चेत आहेत ते मुंबई इंडियन्स. सलगपणे दोनदा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानने मुंबईला 23 धावांनी मात दिली. मुंबईसाठी हा त्यांचा चालू हंगामातील सगल दुसरा पराभव ठरला. याला काही लोकांनी धोनीलाही कारणीभूत ठरवले होते. आता अशातच अजून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संचालक झहीर खान यांच्यामध्ये मतभेद असल्याचे आता समोर आले आहे. हे मतभेद वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उघड झाले. ‘सूर्यकुमार यादव हा आम्ही कायम राखलेला खेळाडू आहे. तो संघातील महत्त्वाचा मोहरा आहे. तो मैदानावर उतरावा म्हणून आम्ही सारेच उत्सुकतेने प्रतिक्षा करीत आहोत. आयपीएलमध्ये पुढील लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल’, असे झहीर खानने सामना होण्यापूर्वी सांगितले होते. त्यानंतर सूर्यकुमार सरावही करताना दिसला होता. हा सामना मुंबईने गमावला आणि या सामन्यात सूर्यकुमार प्रत्यक्षात खेळलाच नाही.

यानंतर ‘सूर्यकुमार जेव्हा फिट होईल तेव्हा त्याला थेट संघात स्थान देण्यात येईल. सूर्यकुमारच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याची ही दुखापत बरी होण्याच्या मार्गावर आहे’, असे मत रोहित शर्माने मांडले.

Advertisement

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार फिट असल्याचे झहीरने सांगितले होत, तर सामन्यानंतर रोहितने तो फिट नसल्याचे म्हटले होते. मग आता नेमके खरे कुणाचे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. शेवटी त्यांच्यात मतभेद असल्याचे समजले. त्यामुळे दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

Advertisement