SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता घरबसल्या मिळवा रेशनकार्ड, सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही…!

रेशनकार्ड.. अर्थात शिधापत्रिका.. एक महत्वाचा सरकारी दस्ताऐवज…मात्र, केवळ पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्डकडे पाहू नका.. गरजू लोकांना रेशनकार्डच्या मदतीनेच स्वस्त दरात धान्य दिले जाते.. कोरोना संकटात तर मोदी सरकारने रेशनकार्डद्वारेच देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन उपलब्ध करुन दिले होते..

रेशन कार्डमुळे (Ration Card) तुम्हाला अनेक सरकारी सुविधा मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचं रेशनकार्ड असणं आवश्यक आहे.. विशेष म्हणजे, त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठेही झिजवण्याची गरज नाही. सध्याच्या डिजिटलाझेशनच्या जमान्यात तुम्ही अगदी घरबसल्याही रेशनकार्ड मिळवू शकता…

Advertisement

कोण अर्ज करू शकतो?
– प्रत्येक भारतीय नागरीक रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतो.
– 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश पालकांच्या रेशनकार्डमध्ये केला जातो..
– 18 वर्षांवरील नागरिक स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताे.

असा करा ऑनलाईन अर्ज..?

Advertisement
  • रेशन कार्ड बनवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.
  • नंतर अप्लाय ‘ऑनलाईन फाॅर रेशनकार्ड’ पर्यायावर क्लिक करा.
  • रेशनकार्डसाठी 5 ते 45 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल. शुक्ल भरून अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.
  • ‘फिल्ड व्हेरिफिकेशन’ झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्यास रेशनकार्ड मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी केलेले ओळखपत्र, हेल्थ कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • वीज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट अथवा पासबुक, भाडेकरार.

रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याचे स्टेटसही तुम्हाला घरबसल्या जाणून घेता येते. त्यासाठी सुरुवातीला ‘डिपार्टमेंट ऑफ फूड’च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यावर ‘Citizen Corner’ सेक्शनवर क्लिक करा. नंतर ‘Track Food Security Application’वर क्लिक करा. तेथील चार पर्यायांपैकी एक भरल्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती समजू शकते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement