SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्र पोलिस दलात नोकर भरती सुरु..! पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (MPA Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

महाराष्ट्र पोलिस दलातील ही भरती कशी होणार आहे, कोणत्या जागांसाठी भरती होत आहे, अर्ज कसा करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!

Advertisement

या पदांसाठी भरती

 • शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार (Academic & Technological Lead Consultant)
 • वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक (Senior Program Manager)
 • कार्यक्रम व्यवस्थापक (Program Manager)
 • I.T. सहाय्यक (I.T. Assistant)
 • डेटा सहाय्यक (Data Assistant)

शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार

Advertisement

शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार- 

 • इच्छूक उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून ‘पोस्ट ग्रॅज्युएशन’पर्यंत झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
 • पदभरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
 • पगार- 12,00,000/- संपूर्ण प्रोजेक्टसाठी

वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक

Advertisement
 • इच्छूक उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून ‘पोस्ट ग्रॅज्युएशन’पर्यंत झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
 • पदभरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
 • पगार- 55,000/- रुपये प्रतिमहिना

कार्यक्रम व्यवस्थापक

 • इच्छूक उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून ‘ग्रॅज्युएशन’पर्यंत झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
 • पदभरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
 • पगार – 45,000/- रुपये प्रतिमहिना

I.T. सहाय्यक

Advertisement
 • इच्छूक उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आयटी (IT) क्षेत्रात ‘ग्रॅज्युएशन’पर्यंत झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
 • पदभरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात
 • पगार – 30,000/- रुपये प्रतिमहिना

डेटा सहाय्यक

 • इच्छूक उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आयटी (IT) क्षेत्रात ‘ग्रॅज्युएशन’पर्यंत झालेलं असावं.
 • उमेदवारांनी डेटा सायन्सचा कोर्स पूर्ण केलेला असणं आवश्यक.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
 • पदभरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात
 • पगार – 20,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – चालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक- 422007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.mpa.nashik.gov.in/

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

Advertisement