SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

21-22 दरम्यान विकलेल्या गाड्या ‘ही’ कंपनी मागवतेय परत; वाचा, नेमकं काय आहे कारण

मुंबई :

गेल्या काही वर्षात टेस्टिंगमध्ये व्यवस्थित चेकिंग न झाल्याने अनेकदा गाड्यांवर मार्केटमधून मागे बोलावून घेण्याची नामुष्की अनेक कंपन्यांवर ओढवली आहे. आता असाच प्रकार चक्क एका ऑटो क्षेत्रातील अतिशय मोठ्या आणि नामांकित अशा कंपनीसोबत घडला आहे.

Advertisement

तांत्रिक कारणामुळे मर्सिडीज बेन्झने आपल्या विविध मॉडेलच्या अनेक गाड्या मागे बोलावल्या आहेत. यात सी-क्लास, ई-क्लास, एस-क्लास, एसएल, ई-क्लास कूप आणि कन्व्हर्टेबल, सीएलएस, एएमजी जीटी ४-डोर कूप आणि स्टीअरिंग व्हीलने सुसज्ज असलेल्या EQS गाड्यांचा समावेश आहे.

नेमका काय होता Technical fault :-  चामड्याचे आवरण असलेले स्टिअरिंग व्हील लवकर गरम होत आहे. त्यामुळे हँड फ्री सेन्सरवर परिणाम होत आहे. स्टिअरिंगवरून हात काढल्यानंतरही त्यावर हात असल्याचं सेन्सर दर्शवत आहे. त्यामुळे ऑटो पायलट मोडमध्ये गाडी चालवताना अडचण येत होती. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने पावलं उचलण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान आता असा प्रोब्लेम फेस करणाऱ्या सगळ्याच गाड्या परत बोलवत असल्याची माहिती कंपनीकडून मिळत आहे. त्यावर उपाय म्हणून हे सेन्सर हटवून अपडेट प्रोडक्ट दिले जाईल किंवा सेन्सर सॉफ्टवेअर अपडेट केले जाईल. एकूणच तातडीने ही समस्या दूर करण्यासाठी मर्सिडीज प्रयत्नशील असल्याचे कळत आहे. ज्या काही गाड्यांच्या अॅक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट सॉफ्टवेअर आणि डिस्ट्रोनिक ड्रायव्हर असिस्टंटमध्ये तांत्रिक बिघाड असेल, ते पूर्णपणे क्लियर करूनच गाडी पुन्हा ग्राहकांना दिली जाईल.

Advertisement