SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रातील ‘ते’ शहर हादरले; भरदिवसा घराबाहेर प्रसिद्ध व्यावसायिकावर गोळीबार; वाचा संपूर्ण घटना

नांदेड :

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकसंजय बियाणी(Sanjay Biyani) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला होता.

Advertisement

शहरातील शारदानगर येथील त्यांच्या घरासमोरच गोळीबार करण्यात आला. सुरुवातीला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे गोळीबारात गंभीर जखमी झाले. दोन दुचाकीवर आलेले आरोपी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसले होते.

दरम्यान, गोळीबाराची घटना cctv मध्ये टिपली गेली आहे का? याचा तपास पोलिस घेत आहेत. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला आहे. गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरलीय.

Advertisement

संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ होते. खंडणी वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत त्याचा चालक देखील जखमी झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदा यांने खंडणीसाठी धमकी दिली होती. तेव्हा पासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वीच संजय बियाणी यांच्यासह 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला, हे अजूनही समजलेलं नाही.

Advertisement