SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महसूल आणि वन विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘एवढा’ मिळेल पगार

मुंबई :

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी सरकारी नोकरीची एक मोठी सुवर्णसंधी आणली आहे. या आर्थिक अस्थिरतेच्या काळात ही संधी कुणीही सोडू नये. पर्यावरण तज्ञ, GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra)असणार आहे. महसूल आणि वन विभाग मुंबई इथे ही भर्ती लवकरच होणार आहे.

Advertisement

अशी आहे प्रोसेस :-

  • सर्वात आधी पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या मेलआयडी वर आपले अर्ज पाठवणे बंधनकारक आहे.
  • त्यानंतर आपल्याला पत्ता मिळेल, त्या पत्त्यावर सबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 असणार आहे तर मुलाखतीची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे.

काय आहेत पदे आणि अटी :-

Advertisement
  • पर्यावरण तज्ञ (Ecologist) – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून Degree / Diploma पर्यंत शिक्षण, पदाचा किमान अनुभव आवश्यक
  • GIS तज्ञ (GIS Expert) –Degree in Remote Sensing and GIS पर्यंत शिक्षण आवश्यक, संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक
  • उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) –  मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून MSW/Degree/Diploma पर्यंत शिक्षण आवश्यक

पगार :-

  • पर्यावरण तज्ञ (Ecologist) – 25,000/- रुपये प्रतिमहिना
  • GIS तज्ञ (GIS Expert) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
  • उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी :- [email protected]

Advertisement

मुलाखतीचा पत्ता :- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – 400091

Advertisement