SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यंदाच्या लग्नसराईत सोनं चकाकणार, वाचा सोने-चांदीचे आजचे ताजे दर..

मागील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात सतत सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अधिक परिणामही सोने-चांदीच्या भावावर होत आहे. सध्या रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे.

आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,800 रुपये आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार एक किलो चांदी 66,600 रुपये दराने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती देशभर बदलत असतात. लग्नसराई काही दिवसांनी जोमात सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हीही सोनं (Gold Silver Price) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे दर काय आहेत.

Advertisement

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार काही शहरांतील सोन्याचे दर

▪️ मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,800 रुपये आहे.
▪️ मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,140 प्रति 10 ग्रॅम आहे.

Advertisement

▪️ पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,850 असेल
▪️ आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,190 रुपये असेल.

▪️ नागपूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47,850 रुपये आहे.
▪️तर नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,190 रुपये आहे.

Advertisement

▪️ चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर फक्त 666 रुपये आहे.

सोने खरेदी करत असताना त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. सोन्यावर असणारे हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच तुम्ही खरेदी करावी. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक अधिक पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवर असतात. तसेच तुम्ही अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सला भेट देऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement