SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एलन मस्क यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, काही मिनिटांतच सोशल मीडियावर घातला धुमाकूळ..

आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत ट्विट करणारे टेस्लाचे प्रमुख उद्द्योगपती एलन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटरमध्ये नुकतीच 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. आता मस्क हे ट्विटर कंपनीतील 9.2 टक्के हिश्शासह सर्वात मोठे समभागधारक बनले आहेत. यांनतर काहीही वेळ न लावता त्यांनी लगेच ट्विटरमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.

आता उद्द्योगपती एलन मस्क यांच्याकडे ट्विटरचे सहसंस्थापक असणाऱ्या जॅक डॉर्सीं यांच्यापेक्षा चार पटीने जास्त समभाग आहेत. मस्क यांच्या या मोठ्या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये 26 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत असताना त्यांनी केलेल्या एका ट्विटची सध्या ट्विटरवर फारच चर्चा होतेय.

Advertisement

झालं असं की, भारतीय वेळेनुसार आज मंगळवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मस्क यांनी, “तुम्हाला एडीट बटण हवंय का?” असा प्रश्न विचारत ट्विटर यूजर्सचे मत विचारात घेण्यासाठी ट्विटर पोल घेतला आहे. होय किंवा नाही असे दोन पर्याय त्यांनी दिले आहेत.

महत्वाचं म्हणजे या ट्विटर पोलला सुरुवातीच्या चार तासांमध्ये (सकाळी 10 वाजेपर्यंत) तब्बल 15 लाख 95 हजारहून जास्त मतं लोकांकडून देण्यात आली. तर त्यानंतर साडेदहा वाजता हा आकडा 16 लाख 70 हजारांहून जास्त होता. हे ट्विट 32 हजार 600 हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलं असून त्याला 1 लाख 10 हजारांहून जास्त लाईक्स आहेत. आज सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 75 टक्के लोकांनी ‘होय एडीट पर्याय हवाय’ असं म्हटलंय तर 2 टक्के लोकांनी ट्विटर आहे तसंच बरं आहे मत व्यक्त केलं आहे.

Advertisement

एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करण्याआधीही एक पोल घेतला होता. त्यात त्यांनी ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कठोरपणे पालन करते की नाही? असं आपल्या जवळजवळ 8 कोटी ट्विटर फॉलोवर्सना प्रश्न विचारत हेदेखील म्हटलं कि काळजीपूर्वक मत मांडा कारण तुमच्या मताचे, मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असणार आहे, हे म्हटलं होतं. या मतदानामध्ये 70 टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.

या पोलनंतर एलन मस्क यांनी ट्विटरला इतर कोणता पर्याय आहे का? अशी विचारणा केली. तसेच ‘मी माझा स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत गंभीर विचार करत आहे’, असंही सांगितलं. जर मस्क यांनी स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु केला तर तो नक्कीच फायद्यात राहील असा विचार ट्विटरने केला असावा आणि मग काय , परिणाम असा झाला की, त्यानंतर लगेचच मस्क यांनी ट्विटरमध्ये भलीमोठी गुंतवणूक केल्याची बातमी समोर आली. आता ट्विटरमधील गुंतवणुकीआधीचा पोल आणि नंतरची घडामोड आणि आता ट्विटरच्या एडीट बटणसंदर्भातील पोल यावरुन लवकरच ट्विटरमध्ये काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement