SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डीझेलची पुन्हा खिशाला झळ; देशात सगळ्यात महाग इंधन विकलं जातंय महाराष्ट्रातील ‘त्या’ जिल्ह्यात

मुंबई :

सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल किमतीतील वाढ (Petrol-Diesel Hike) सतत सुरू आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल किमतीत 80 पैसे प्रति लीटरची (Petrol-Diesel Price Today) वाढ झाली आहे. कंपन्या त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई होईपर्यंत इंधन दर वाढवू शकतात.

Advertisement

मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढला आहे. त्यामुळं आज मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 103.92 रुपये झाला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकलं जात आहे. आजच्या दरवाढीनंतर परभणीत एक लिटर पेट्रोल 122.01 रुपये आहे. तर, डिझेल 104.62 रुपये इतकं आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे.

5 राज्यांच्या निवडणुकामुळे पेट्रोल-डीझेलचे दर वाढवण्यात येत नव्हते. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांन मोठे नुकसान सहन करावे लागले. आता ती नुकसानभरपाई भरून निघेपर्यंत पेट्रोल-डीझेलचे दर वाढतच राहणार आहेत. अजून साधारणपणे 6 ते 8 रुपये दर वाढू शकतात.

Advertisement

गेल्या आठवड्याभरापासून इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांचे हाल झाले आहेत. सायकल घ्यावी की काय, अशी वक्तव्ये कानावर पडताहेत. पेट्रोल प्रतिलिटर 118 आणि डिझेल शंभरीच्यापार गेलेले असताना सीएनजीने आता 111 रुपयांवर मजल मारली आहे. मुख्य म्हणजे, हा दर डिझेलपेक्षा अकरा रुपयांनी अधिक आहे.

शहर पेट्रोल डीझेल
दिल्ली 104.61 95.87
कोलकाता 114.28 99.02
मुंबई 119.67 103.92
चेन्नई 110.09 100.18

 

Advertisement