SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एफडी’वरील व्याजदराबाबत बॅंकांचा महत्वपूर्ण निर्णय, गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम…!

म्हातारपणात कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, म्हणून आयुष्याच्या उतार वयासाठी प्रत्येक जण काही तरी तजवीज करुन ठेवत असतो.. त्यासाठी सध्या बाजारात वेगवेगळ्या ‘पाॅलिसी’ सुरु आहेत. मात्र, आपल्या घामाचे दाम सुरक्षित असणंही तितकंच महत्वाचं..!

गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे ‘एफडी’.. अर्थात ठेवी..! सुरक्षित गुंतवणुकीसाठी ‘एफडी’ नेहमीच सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक बॅंकांनी ‘एफडी’वरील व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात केली.. त्यामुळे ठेवीतून पुरेसा परतावा मिळत नसल्याचे दिसते..!

Advertisement

मात्र, काळजीचे कारण नाही.. कारण आता अनेक ‘स्मॉल सेव्हिंग्स’ बँकांनी ‘एफडी’वर आकर्षक व्याजदर देण्यास सुरुवात केलीय.. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी जादा व्याजदर दिला जात आहे.. छोट्या बॅंकांमध्ये ‘एफडी’ची वाढती संख्या नि ग्राहकांच्या विश्वासार्हतेमुळे बँकांनी व्याज दरवाढीचा मोठा निर्णय घेतला आहे..

ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम बऱ्याचदा बँकांमध्येच ‘एफडी’ स्वरुपात ठेवतात. या बँकांकडून आता ज्येष्ठांना ‘एफडी’वर आकर्षक व्याजही मिळते. सध्या दोन कोटींहून कमी रकमेवर एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.75 टक्के व्याज दिले जात असल्याचे पाहायला मिळते.

Advertisement

कुठे किती व्याज मिळणार..?

  • स्मॉल फायनान्स बँका, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँका, रेप्को बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवीवर 7 टक्के व्याजदर मिळतो.. दोन वर्षांसाठी समान रकमेच्या ठेवीवर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 7.25 टक्के व्याज देतेय.
  • इंड्स इंड बँक, आरबीएल बँक ज्येष्ठांना 7 टक्के व्याज देतात. या दोन्ही बॅंका सर्वसाधारण ग्राहकांना 6.5 टक्के व्याज देतात..
  • उत्कर्ष बँक दोन कोटीपेक्षा कमी आणि दोन वर्षांपर्यंतच्या ‘एफडी’वर 6.75 टक्के व्याज देते. ज्येष्ठांसाठी हा व्याजदर 7.25 टक्के आहे.

ठेवींना सुरक्षा कवच
स्माॅल फायनान्स बँका, खासगी बँका अधिक व्याज देत असल्या, तरी त्यांचे आर्थिक गणित बिघडल्यास ठेवीचे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण घाबरण्याची कारण नाही.. ‘डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’द्वारे (DICGC) वित्तीय संस्थांमधील 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षा कवच दिले जाते. त्यामुळे तुमचे पैसे एकदम सुरक्षित असल्याची हमी मिळते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement