SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 5 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून 92 तलवारी, 2 कुकरी केल्या जप्त; हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता

✒️ लखनऊ सुपर जायंट्सने दिलेले 170 धावांचे लक्ष्य गाठण्यास हैदराबादला अपयश, हैदराबाद 12 धावांनी पराभूत,​​​ आवेश खानचा 4 बळी घेत हैदराबादला जोर का झटका

Advertisement

✒️ प्रवास करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला बूस्टर डोस घेणे आवश्यक, बूस्टर डोसबाबत लवकरच धोरण जाहीर केले जाणार; सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहीती

✒️ राजस्थानमधील करौली येथे हिंसाचारात एका मुलाचा जीव वाचवणारा हवालदार रातोरात बनला हिरो, आगीने वेढलेल्या लहान मुलाचा वाचवला जीव

Advertisement

✒️ ओला, उबर आणि इतर 10 अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना तात्पुरते परवाने मंजूर करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात माहिती

✒️ हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये शंभर एकर जमिनीवर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारली जाणार, राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी

Advertisement

✒️ बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘जर्सी’ सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, झी म्युझिक कंपनीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर केला शेअर

✒️ टेस्लाचे प्रमुख एलन मस्कने ट्विटरमध्ये 2.8 अब्ज डॉलर्सची केलीय गुंतवणूक, यासह मस्क ट्विटरमधील 9.2 टक्के हिश्श्यासह सर्वात मोठे समभागधारक

Advertisement

✒️ चायना लोन ॲप प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, किरकोळ रक्कम देऊन कर्जदारांकडून करत होते मोठी वसुली; 2 दिवसांपूर्वीही 8 आरोपींना झाली आहे अटक

✒️ बिग बॉस-15 फेम तेजस्वी प्रकाश अभिनय बेर्डेसोबत मराठी चित्रपटातून पदार्पणासाठी सज्ज, ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement