SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. खाण्यावर आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नोकरीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. मालमत्तेशी फार दिवसांनी तुमची प्रकृती उत्तम असेल.

वृषभ (Taurus): जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच त्या दिशेने पावले उचलावीत. आज तुम्ही आपली कर्तव्ये योग्य वेळेवर पार पाडू शकाल. व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. घरामध्ये तुम्हाला खूप जबाबदारी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.

मिथुन (Gemini) : कौटुंबिक जबाबदा-या, बंधनांकडे त्वरित लक्ष द्या. निष्काळजीपणा महागात पडेल. व्यापाराशी संबंधित व्यक्तींनी कामे इमानदारीने करावीत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील. विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. उपासना केल्याने मनाला शांती मिळेल. जास्त खर्च होईल.

कर्क (Cancer) : अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन नियोजन करू शकता. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण असू शकते. स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या भविष्यातील योजनांवर काम करा, यश नक्कीच मिळेल.

Advertisementसिंह (Leo) : एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करायला आज उत्तम दिवस आहे. नवे व्यवासायिक करार यशस्वी होतील. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरातून बाहेर पडताना काळजी घ्या. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नौटंकीपासून दूर राहावे लागेल.

कन्या (Virgo) : कोर्टकचेरीच्या कामातून आज तुमची सुटका होऊ शकते. जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच त्या दिशेने पावले उचलावीत. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका. जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना कायदेशीर बाजू समजून घ्यावी लागेल.

तुळ (Libra) : नोकरदार व्यक्तींसाठी वाता-वरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. तुमच्या मनासारख्या घटना घडल्याने मान प्रसन्न राहिल. कामाच्या ठिकाणी होणारे गैरसमज टाळा. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये काही विषयात मतभेद असतील.

वृश्‍चिक (Scorpio) : श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. तुम्हाला पैसे कमावण्याची ताकद मिळेल. नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात. पैशाशी संबंधित काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. प्रत्येक विषयात काही तरी कुरबुर होईल. दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ देखील उत्तम राहील पण बचत देखील करा.

Advertisementधनु (Sagittarius) : आज तुम्ही आपली कर्तव्ये योग्य वेळेवर पार पाडू शकाल. या राशीतील व्यक्तींच्या घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. व्यावसायिकांना काही व्यक्तींसोबत आवश्यक भेटीगाठी कराव्या लागतील. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला पाळणे हितकारक ठरेल. यशामुळे तरुण उत्साही होतील.

मकर (Capricorn) : आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. आज मित्र मोलाचे सल्ले देतील. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते. काही जुन्या मित्र मैत्रिणी भेट देतील किंवा फोन करतील. कुटुंबाला वाईट वागणूक दिल्यास काही त्रास होण्याचे संकेत.

कुंभ (Aquarious) : आज तुमच्या स्वभावात स्पष्टता आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. तुमच्या अपत्यांची मदत मिळेल. घरातून काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. तुम्हाला पैसे आणि मौल्यवान वस्तूंबाबत जास्त काळजी घ्यावी लागेल. दिवस शुभ असेल.

मीन (Pisces) : आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल.
आज तुम्ही परोपकारी काम करू शकता. आज परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल राहू शकते. तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरूच राहतील. तरुणांना अपेक्षित रोजगार मिळू शकतो.

Advertisement