SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टाटा’ची नवी इलेक्ट्रिक कार धमाका करणार, सिंगल चार्जिंगमध्ये 590 किमी धावणार..

पेट्रोल-डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेत.. इंधन दरवाढीला वैतागून आता अनेक जण ‘सीएनजी’ किंवा इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करीत आहेत.. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेऊन दिग्गज कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यास सुरवात केलीय..

भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह असणारा ‘टाटा ग्रुप’ही (Tata) आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत उतरला आहे. देशांतर्गत इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये ‘टाटा’ चांगली कामगिरी करत आहे. टाटा मोटर्सच्या ‘नेक्सन ईव्ही’ (Nexon EV) व टिगोर ईव्ही (Tigor EV) या दोन गाड्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

Advertisement

‘टाटा मोटर्स’ने नुकताच एक टीझर रिलिज केला. त्यात शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘न्यू ईव्ही’ (New EV) व ‘गेस व्हाॅट्स’ (Guess whats) असे शब्द वापरले आहेत. या व्हिडीओत सांगिलेली गाडी म्हणजेच, ‘टाटा’ची नवी ‘टाटा सिएरा ईव्ही’ आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांना मिळणार प्रतिसाद पाहून, ‘टाटा मोटर्स’ने 2020 ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘नेक्स्ट जनरेशन टाटा सिएरा इलेक्ट्रिक’ (Tata Sierra Electric) कार लाॅंच केली होती. आता कंपनीने या कारसाठी ‘प्री-बुकिंग्स’ घेण्यास सुरुवात केलीय. याबाबत नुकतीच कंपनीने माहिती दिली. त्यामुळे लवकरच ही कार रस्त्यावर धावताना दिसू शकते..

Advertisement

टाटा सिएरा ईव्हीचे फीचर्स

– टाटा सिएरा ईव्ही या ‘एसयूव्ही’ (SUV) कारमध्ये 69kWh बॅटरी दिली आहे, जी दोन सेक्शनमध्ये विभागली आहे. एका सेक्शनमध्ये ‘बॅटरी फ्लोर’मध्ये सेट केलीय, तर दुसरी ‘बोट प्लोर’ अंतर्गत वापरली आहे.
– ही कार FWD (सिंगल इलेक्ट्रिक मोटर) आणि AWD (टू इलेक्ट्रिक मोटर्स) या दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. पॉवर आउटपुटची माहिती कंपनी लॉन्चिंगदरम्यान उघड करील.

Advertisement

– सिंगल चार्जमध्ये ही कार तब्बल 590 किमीची ड्रायव्हिंग रेंज देणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
– कारची लांबी 4.1 मीटर आहे. आत 12.12 इंचांची ‘टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम’ आहे. त्यात ‘आयआरए प्लेस प्रो कनेक्ट’ (IRA Place Pro Connect) फीचर्स असतील.

– कारमध्ये 7.7 इंच ‘प्लाझ्मा स्क्रीन’ वापरली आहे, जे ‘डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर’ आहे. तसेच, कारमध्ये मोठं ‘पॅनोरमिक सनरूफ’ दिलं आहे.
– कारला 360 डिग्री ‘व्ह्यू कॅमेरा’ मिळेल.. ज्याच्या मदतीने युजर्सना पार्किंग व रिव्हर्सिंग एक्सपीरियन्स मिळेल.
– कारमध्ये 19 इंची चार ‘अलॉय व्हील’ असतील. कारमध्ये ‘हाय स्पीड वॉर्निंग सेन्सर’ आहेत. यूजर्सना ‘टर्न इंडिकेटर’ आणि ‘डोअर ओपेनिंग वॉर्निंग साउंड’ही मिळेल.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement