SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोस्ट ऑफिसच्या सेवांचा घरबसल्या घ्या फायदा, आता ‘हा’ फोन नंबर येईल कामाला..

आर्थिक वर्ष 2022-23 ला सुरुवात झाली आहे. अनेक वित्तीय संस्थांच्या, बँक आणि पोस्ट ऑफिस यांचे नवीन आर्थिक वर्षाचे काम सुरू झाले आहेत. यंदाचा उन्हाचा झटका लवकरच म्हणजे मार्चमध्येच जाणवत आहे. अशात आपली बाहेरील अनेक कामे खोळंबून जातात.

कोरोना लॉकडाऊनमध्ये अशी कामे लवकर होण्यासाठी काही बँकांनी यापूर्वीच आपल्या सेवा ऑनलाईन केल्या आहेत, त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या अनेक सेवांचाही ग्राहकांना घरबसल्या लाभ घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला कर बचतीसाठी पीपीएफ (Public Provident Fund), आरडी (Recurring Deposit Account), सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करणे (Sukanya Samriddhi Yojana) व इतर कामे समाविष्ट आहेत. ही कामे तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता.

Advertisement

पोस्ट ऑफिसबद्दल सांगायचं झालं तर डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसद्वारे (Doorstep Banking Service) ग्राहकांना ही सुविधा मिळू शकते. पोस्ट ऑफिसची ही सेवा भारतातील प्रत्येक जिल्हा, शहर व गावातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

IPPB नुसार, डोअरस्टेप बँकिंग सर्व्हीसचा (IPPB Doorstep Banking) लाभ घेऊन ग्राहक रोख ठेव, पैसे काढणे-भरणे, बिल भरणे, फंड ट्रान्सफर, विमा/सामान्य विमा/म्युच्युअल फंड खरेदी, जीवन विमा खरेदी करणे, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जनरेशन, लहान बचतींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. , डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी, तुम्हाला फक्त 20 रुपये + GST शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

IPPB वेबसाईटवर असलेल्या माहीतीनुसार, ग्राहक डोअर स्टेप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या कॉल सेंटर नंबर 155299 वर कॉल करून सकाळी 11:00 ते सायंकाळी 4 दरम्यान स्लॉट बुक करू शकतात. या सुविधेमुळे ग्राहकांना जास्त फायदा होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement