SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हैदराबादमध्ये रेव्ह पार्टी! 142 जण ताब्यात; ‘या’ खासदार, अभिनेत्यांच्या मुलींचाही समावेश..

सध्या राजकारणातील खेळी, ईडीच्या धाडी, ड्रग्ज प्रकरणे आणि रेव्ह पार्ट्या मोठ्या प्रमाणात खळबळ माजवत आहेत. आता देशात हैदराबादमधील आणखी एक बातमी व्हायरल होत आहे. येथे एका रेव्ह पार्टीमध्ये (Hyderabad Rave Party News) 142 जण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रेटींच्या मुलींचाही समावेश असल्याने त्यांना राब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सच्या पथकाने बंजारा हिल्स भागातील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये मद्याच्या पार्टीचा पर्दाफाश केला. तेथून जवळजवळ 142 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कोकेन आणि चरससारखे प्रतिबंधित पदार्थ जप्त केले आहेत. या रेव्ह पार्टीमध्ये अनेक दिग्गज, व्हीआयपी, अभिनेते, राजकारणी लोकांच्या मुलांचाही समावेश असल्याचं कळलं आहे.

Advertisement

पवन कल्याण यांचे नातेवाईक प्रसिद्ध अभिनेता नागा बाबू यांची मुलगी व सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांची भाची अभिनेत्री निहारिका कोनिडेला आणि बिग बॉस तेलुगु विजेता राहुल सिपलीगंजसह इतर जणांना यासंबंधी रविवारी पहाटे 3 वाजता हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. निहारिका कोनिडेला दक्षिणेतील एका मोठ्या सिने कुटुंबामधील आहे. अशा परिस्थितीत रेव्ह पार्टीदरम्यान त्याच्या अटकेच्या बातमीने साऊथ सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

नागा बाबूने नंतर एक व्हिडीओ पोस्ट करून सांगितलं की, त्यांच्या मुलीचा ड्रग्सशी काहीही संबंध नाही. यामध्ये आंध्र प्रदेशातील एका उच्च पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आणि राज्यातील तेलुगु देसमच्या खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे. अनेक जणांनी आपापली मुले दोषी नसल्याचे सांगितले तरी अधिक तपासात खूप काही उघड झालं आहे. माहितीनुसार, हॉटेलच्या पबची मालक एका माजी खासदाराची मुलगी असल्याचं समजतंय. दरम्यान हैदराबादमध्ये काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement