SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजही पेट्रोल-डीझेल करणार खिसा मोकळा; वाचा, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील ताजे दर

मुंबई :

पेट्रोल-डीझेल गेल्या 14 दिवसांमध्ये 12 वेळा वाढले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डीझेलच्या दरात 40 पैशांची वाढ झाली आहे. सातत्याने वाढणारे इंधनाचे दर सामान्य माणसाच्या खिशाला झळ पोहोचवत आहेत. अच्छे दिन म्हणून सरकारने सत्ता तर मिळवली परंतु अच्छे दिन खरोखरच आलेत का? हे सामान्य जनतेने एकदा तपासून बघणे, गरजेचे झाले आहे.

Advertisement

नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत एकदाही इंधन दरवाढ झाली नाही. मात्र 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे निवडणुकात मतदानाचा फटका बसू नये, म्हणून दरवाढ थांबवली होती, हे सहजपणे लक्षात येते. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत.

वाढत्या महागाईवरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच देशातील इतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची तरुणांची फौज असणाऱ्या युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. तर, प्रवास सेवा देणारी पहिल्या 5 मधील कंपनी उबरनं देखील त्यांच्या सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.

Advertisement

 

महाराष्ट्रातील प्रमुख शहर पेट्रोल डिझेल
ठाणे  118.08 100.88
सातारा 119.03  101.73
सांगली 118.74 101.48
कोल्हापूर 118.91 101.65
लातूर 119.66 102.35
औरंगाबाद 120.28 102.85
नागपूर 118.84 101.58

 

Advertisement